बांद्यात १४ नोव्हेंबरला पर्यावरण पूरक खुली आकाशकंदील स्पर्धा

रोटरी क्लब ऑफ बांदाचे आयोजन

बांदा (प्रतिनिधी) : रोटरी क्लब ऑफ बांदातर्फे रविवार १४ नोव्हेंबर रोजी भव्य आकाश कंदील स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक ५ हजार रुपये, द्वितीय तीन हजार व तृतीय २ हजार रुपये ठेवण्यात आल्याची माहिती चेअरमन प्रमोद कामत यांनी पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले, रोटरी क्लब ऑफ बांदातर्फे प्रथमच भव्य आकाशकंदील स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा गांधी चौकातील विठ्ठल रखुमाई हॉलमध्ये सायंकाळी ४ वाजता सुरू होईल. स्पर्धेत आकाशकंदील पर्यावरण पूरक असावा. आकाश कंदीलची उंची कमाल तीन फुटापर्यंत असावी. प्लास्टिक आणि थर्माकोलचे कंदील स्पर्धेत ग्राह्य धरले जाणार नाहीत. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली राहील. स्पर्धकांना वीज कनेक्शन देण्यात येईल. स्पर्धा संपल्यानंतर सायंकाळी उशिरा स्पर्धेचे परीक्षण व बक्षीस वितरण करण्यात येणार आहे.
इच्छुक स्पर्धकांनी बाबा काणेकर (९८२३६६११३३), आबा धारगळकर  (९४२२३८८२४८), स्वप्निल धामापूरकर (९४२३३०२१८७) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन रोटरी क्लब ऑफ बांदा चेअरमन प्रमोद कामत, माजी अध्यक्ष मंदार कल्याणकर, सेक्रेटरी बाबा काणेकर, खजिनदार शिवानंद भिडे यांनी केले आहे.