भडगाव ग्रामपंचायत वर फडकला भाजपचा झेंडा

निलेश राणे यांचे पीए योगेश घाडी ठरले किंग मेकर

कुडाळ l प्रतिनिधी :     माजी खासदार निलेश राणे यांचे स्वीय सहाय्यक योगेश घाडी ग्रामपंचायत निवडणुकीत आपला करिष्मा दाखवण्यात यशस्वी झाले आहेत. अतिशय अतितटीच्या लढतीत आमदार वैभव नाईक यांना धूळ चारत भाजपाने ग्रामपंचायत वरती झेंडा फडकवला आहे. कुडाळ तालुक्यातील हाय व्होल्टेज ड्रामा म्हणून ओळखली जाणारी भडगाव ग्रामपंचायत च्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. माजी खासदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली भाजपने ही निवडणूक एक हाती जिंकत आमदार वैभव नाईक यांना जोरदार धक्का दिला आहे. भाजपचे सरपंच गुणाजी लोट हे 101 मतांनी सरपंच म्हणून विजयी झाले आहेत. सरपंच गुनाजी लोट हे जनतेतून निवडून आले आहेत तर सदस्य राजेंद्र राणे हे प्रभात एक मधून निवडून आले आहेत प्रितेश गुरव आरती जडये, रोजमारी भुतेलो, हे विजयी झाले आहेत प्रभाग तीन मधून प्रथमेश मोहिते अंकिता सावंत हे विजयी झाले. भडगाव मध्ये सात पैकी सहा सदस्य भाजपा चे विजयी झाले आहेत केवळ एका जागेवर उभाठा त्यांना समाधान मानावे लागले आहे. भाजपाने या ठिकाणी जोरदार मुसंडी मारली असून सर्व स्तरांमधून विजयी उमेदवारांचे तसेच कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले जात आहे तेथील कार्यकर्ते नूतन सरपंच सदस्य लोकप्रतिनिधी व पदाधिकारी यांचे अभिनंदन केले जात आहे

तालुकाध्यक्ष दादा साईल, विनायक राणे, पप्या तवटे, रुपेश कानडे, आनंद दिपलक्ष्मी पडते, सुप्रिया वालावलकर, शिरवलकर, दिलीप तवटे, लॉरेन्स मान्येकर, बाळू मडव, अरविंद परब, विनोद सावंत, निखिल कांदळगावकर, नागेश परब, चिराग पावसकर, निखिल कांदळगावकर, एकनाथ घाडी यांनी या निवडणुकीत मेहनत घेतली.