चिपळुणात १३ रोजी स्वरभास्कर ही संगीत मैफिल शमिका भिडे आणि अभिजित भट रंगविणार

चिपळूण (वार्ताहर) : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे १३ नोव्हेंबर रोजी स्वरभास्कर हा मराठी गायकांचा दीपावलीची स्वरमय पहाट हा कार्यक्रम आयोजित केला आहे. हा कार्यक्रम इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रामध्ये पहाटे ६ वाजता सुरु होणार आहे. ही स्वरमय पहाटची मैफिल आघाडीची गायिका शमिका भिडे व नामवंत गायक अभिजित भट ही मैफिल रंगविणार आहेत.

यानिमित्ताने चिपळूण शहरातील साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कारही होणार आहे. स्वरभास्कर हा कार्यक्रम मोफत असून त्याच्या सन्मानिका हॉलवर उपलब्ध आहेत, अशी माहिती तालुकाप्रमुख विनोद झगडे व शहरप्रमुख शशिकांत मोदी यांनी दिली. गेली अनेक वर्षे दीपावली पहाट हा कार्यक्रम विविध संघटनेच्या माध्यमातून आयोजित करण्यात येत होता. कोरोनानंतर दीपावली पहाट या कार्यक्रमामध्ये खंड पडला म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून सुरमय दीपावली पहाट हा स्वरभास्कर कार्यक्रमामध्ये नामवंत आघाडीची गायिका शमिका भिडे व नामवंत गायक अभिजित भट हे ही मैफिल रंगविणार आहेत. यावेळी त्यांच्या साथीला वैभव फणसळकर, अरविंद जोगळे, दिलीप सकपाळ यांच्या सह नामवंत साथीला असणार आहेत. हा सुरमय पहाटचा कार्यक्रम मोफत असून त्याच्या प्रवेशिका ११ नोव्हेबरपर्यंत इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र किंवा शहरप्रमुख शशिकांत मोदी (८८८८७२२१११), महिला शहर संघटक वैशाली शिंदे (८६०५११०५४४), युवा शहर अधिकारी पार्थ जागुष्टे (७४४७७७४४४२), संतोष पवार (९४२३२९४४२९), राजू विखारे (७६२०९३०७५९), भैय्या कदम (९३२२९३१७५५), संजय रेडीज (९८६०५४५६३२), यतीन कानडे (९०४९७००७२२), सुनील कुलकर्णी (९४२२४३३२२५), मंगेश शेलार (९८९०१३८१०५), संजय गोताड (६७३०१४८५३), बापू चिपळूणकर (९४२२५९५७५४) या पदाधिकाऱ्यांकडे स्वरभास्कर या कार्यक्रमाच्या प्रवेशिका उपलब्ध आहेत. तरी रसिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन शहरप्रमुख शशीकांत मोदी यांनी केले आहे.