खेड | प्रतिनिधी : येथील सहजीवन शिक्षण संस्थेच्या आय.सी.एस. महाविद्यालयाच्या विकास समितीचे चेअरमन अॅड. आनंदराव भोसले यांची नुकतीच मुंबई विद्यापीठ उपपरिसर मंडळाचे सदस्य म्हणून नियुक्ती झाली आहे. त्या प्रित्यर्थ सहजीवन शिक्षण संस्था, आय.सी.एस. महाविद्यालय, एम.बी.ए. महाविद्यालय, श्रीमान चंदूलाल शेठ ज्युनि. कॉलेज व हायस्कूल इत्यादी सर्व विभागांच्या वतीने त्यांचा भव्य असा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहजीवन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हिराचंद बुटाला हे उपस्थित होते. याप्रसंगी महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्या प्रोफेसर डॉ. अनिता आवटी, एम.बी.ए. महाविद्यालयाचे डायरेक्टर डॉ. प्रसाद भणगे, हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक हणमंत गरुड तसेच सी.एम.आय.टी.चे संचालक उत्तम कुमार जैन यांनी आपली मनोगते व्यक्त केली. यावेळी विलास बुटाला, अजित बुटाला, मितेश बुटाला, नम्रता भोसले, तळेकर, डॉ. जी. बी. सारंग, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.









