खेड (प्रतिनिधी)कोल्हापूर येथे झालेल्या १७ वर्षे व १९ वर्षे वयोगटातील विभागीय वुशू स्पर्धेमध्ये ज्ञानदीप संस्थेच्या कै. श्रीमती राधाबाई चंदुलाल तलाठी उच्च माध्यमिक ज्ञानदीप विद्या मंदिर भडगाव प्रशालेने यश मिळवले.
प्रशालेतील अकरावी विज्ञान शाखेत शिकणाऱ्या आर्यन दळवी, तन्मय सुर्वे व बारावी वाणिज्य शाखेत शिकणाऱ्या पार्थ चिखले यांनी रौप्य पदक प्राप्त केले. बारावी विज्ञानमधील पूर्वा दळवी, अय्यान अंतुले, सुयोग रेवणे यांनी कांस्य पदक मिळवले. या विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक व पर्यवेक्षक संतोष भोसले यांनी मार्गदर्शन केले.









