बुडण्यापूर्वी टायटॅनिक जहाजावरील प्रवाशांनी काय खाल्ले होते? फूड मेन्युचा झाला लिलाव; पाहा व्हायरल फोटो

Titanic Food Menu: टायटॅनिक हा सर्वात आलिशान जहाजाबाबत आणि त्याच्या कथेबाबत सर्वांना माहितच आहे. एका दुर्घटनेमध्ये टायटॅनिक जहाज बुडाले आणि जवळपास १५०० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला होता. या १९९७ मध्ये जहाजावर एक चित्रपट देखील तयार करण्यात आला आहे ज्याला जगभरामध्ये पसंती मिळाली होती. टायटॅनिक जहाज बुडाले त्याला १११ वर्ष झाले आहेत. आता पुन्हा हे जहाज सोशल मीडियावर चर्चेत आले आहे. पण यावेळी कारण वेगळे आहे. टायटॅनिक जहाजाचा फूड मेन्यूचा ब्रिटनमध्ये £८३ युरो या किंमीतीला लिलाव झाला. असे मानले जाते की, या फूड मेन्यूची शेवटची कॉपी आहे. यावरून समजते की, दुर्घटनेमध्ये जहाज बुडण्यापूर्वी प्रवाशांनी काय खाल्ले होते हे समजते. इंस्टाग्रामवर TasteAtlas ने या मेन्यूचा फोटो शेअर केला आहे.

टायटॅनिक जहाजावरील प्रवाशांनी मृत्यूपूर्वी काय खाल्ले होते?

फर्स्ट क्लासमध्ये प्रवास करणाऱ्या लोकांना मेनूमध्ये कॉर्न बीफ, स्पायसी व्हेजीटेबल्स, ग्रील्ड मटन चॉप, बेक्ड जॅकेट पोटॅटो, कस्टर्ड पुडिंग आणि स्पायसी बीफ देण्यात आले होते. यासोबतच गाजर, बीटरूट आणि टोमॅटोही या मेनूमध्ये दिसत होते. व्हायरल झालेल्या मेनूवर १४ एप्रिल १९१२ ही तारीख देखील नोंदवण्यात आली आहे. द्वितीय श्रेणीच्या मेनूमध्ये मासे, ब्रेड, लोणी, फळे, फ्राईड एग(अंडे), फ्राईड पोटॅटो(बटाटा), चहा आणि कॉफी यांचा समावेश होता. याशिवाय रात्रीच्या जेवणात त्यांना सूप, ब्रेड, ब्राऊन ग्रेव्ही, सॉस, मिठाई, फळे, भाज्या, भात आणि चहा देण्यात आला. जहाज बुडण्यापूर्वी द्वितीय श्रेणीतील प्रवाशांनी ख्रिसमस पुडिंगचा आस्वादही घेतल्याचे सांगितले जाते.