विश्वचषकातील अंतिम सामनाही याचदिवशी असल्याने विरोधकांचे मेळाव्याकडे लक्ष
चिपळूण (प्रतिनिधी) : एका बाजूला भारताच विश्वचषकासाठीचा सामना रंगणार आहे तर दुसऱ्या बाजूला याचदिवशी आ. शेखर निकम यांचा मुबईतील धामापूर गटातील चाकरमान्यांनी मेळावा आयोजित केला असून विक्रमी गर्दीत झालेल्या दोन मेळाव्यांनंतर हा तिसरा मेळावा आणि तोही भारताची फायनल सुरू असताना होणार असल्याने धामापूर गटातील चाकरमानी कोणाला प्राधान्य देतात याकडेच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह विरोधकांचे लक्ष मुबई येथील चक्रमान्यांच्या मेळाव्याकडे वेधले आहे.
जिल्ह्याच्या राजकीय इतिहासात राष्ट्रवादी अथवा कॉग्रेस यांचे मुबई अथवा पुणे या ठिकाणी चाकरमान्यांचे प्रचंड गर्दीचे मेळावे झाले नाहीत. मात्र, आ. शेखर निकम यांच्या उपस्थितीत असे मेळावे होऊ लागले आहेत ओझरेखुर्द आणि कडवई येथील मुबई ग्रामस्थांचे मेळावे हाऊसफुल्ल झाल्याने आता धामापूर गटाचा तिसरा मेळावा १९ रोजी होत आहे. जिल्ह्याच्या राजकीय इतिहासात असे मेळावे आ. निकम यांनीच घेतल्याची नोंद होत आहे. मुंबई येथील चाकरमानी हे वेगळ्या विचाराचे मात्र, हे वेगळे विचार मुबईमध्ये ठेवून चिपळूण संगमेश्वर मतदार संघ आणि खास करून आ. निकम यांच्यासाठी आणि आपल्या गावाचा वाडीचा विचार करून आ. निकम यांना खंबीर पाठबळ देणारे ठरले असून प्रचंड उपस्थिती लावून जाहीर पाठींबा देत असल्याने साऱ्या जिल्ह्याला वेगळे दृश्य पहावयास मिळत आहे.
धामापूर तर्फे संगमेश्वर जिल्हापरिषद गटाचा मेळावा १९ रोजी मुबई दादर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर हॉल येथे सायंकाळी चार वाजता होणार आहे. आ. शेखर निकम आणि अन्य मान्यवर याच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळावा विक्रमी गर्दीचा ठरणार असल्याचे सांगण्यात येत आहे. आ. शेखर निकम यांनी या गटासाठी तब्बल साठ कोटीचा निधी या ठिकाणी उपलब्ध करून दिला आहे. वाडीवस्तीवर होणारा विकास आणि आ. निकम याचे मिळणारे सहकार्य यामुळेच चाकरमानी एकवटले असून धामापूर गटातील चकमानी वर्गानेच या मेळाव्याचे नियोजन केले आहे. दि. १९ नोव्हेंबर रोजी भारताची विश्वचषकासाठी फायनल होणार आहे. याचदिवशी हा मेळावा होत आहे. त्यामुळे या गटातील चाकरमानी मेळाव्याला प्राधान्य देतात की फायनल बघण्यासाठी घरीच थांबत्तात, हेही तितकेच महत्वाचे ठरले असून चिपळूण-संगमेश्वर मतदार संघातील महत्वाच्या गटाचा हा मेळावा असल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यामध्ये मेळाव्याविषयी औसूक्य निर्माण झाले आहे. ओझरेखुर्द, कडवई गटातील चाकरमानी मोठ्या संख्येने मेळाव्याला उपस्थित राहून मेळावा तो ही मुबईमध्ये यशस्वी करताच साऱ्या जिल्ह्याचे आणि विरोधकांचे लक्ष मेळाव्याकडे लागले आहे. आता तिसरा मेळावा कशापद्धतीने होतो याकडे लक्ष वेधले गेले असून भारताच्या फायनलच्या चर्चेबरोबर मेळाव्याची चर्चाही रंगू लागली आहे.











