अक्षर ग्राफिक्सचे मालक अभय वाटवे यांचे निधन

सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडीतील अक्षर ग्राफिक्सचे मालक आर्टिस्ट अभय वाटवे ( वय ४२ ) यांचे निधन झाले. गेले काही दिवस ते आजारी होते. शुक्रवारी सायंकाळी सबनिसवाडा येथील निवासस्थानी त्यांची प्राणज्योत मालवली.
अभय वाटवे यांचा ग्राफिक्स डिझायनिंग मध्ये हातखंडा होता. अक्षर ग्राफिक्स म्हणून त्यांचे दालन प्रसिद्ध होते. गेले काही दिवस ते आजारी असल्यामुळे ते बंद होते. त्यातच शुक्रवारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे.