जिल्हास्तरीय आंतरशालेय स्पर्धा
माखजन |वार्ताहर :संगमेश्वर तालुक्यातील माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळा च्या कै.पांडुरंग सीताराम लघाटे संगीत कक्षमार्फत, जिल्हा स्तरीय आंतरशालेय सुगम संगीत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.या स्पर्धेच्या प्राथमिक,निवड फेरीला २० नोव्हेंबर पासून सुरवात होत आहे.
विहित कालावधीत नोंदणी केलेल्या स्पर्धकांची प्राथमिक,निवड फेरी २० रोजी कुवारबाव रत्नागिरी येथे दुपारी १.३० वाजता श्रीमती राधाबाई गोपाळ जागुष्टे हायस्कूल येथे होणार आहे.ही निवड फेरी रत्नागिरी,लांजा,राजापूर या तीन तालुक्यातील नोंदणी केलेल्या लहान व मोठ्या गटातील स्पर्धकांची निवड फेरी होईल.पूर्ण स्पर्धेची सुरवात रत्नागिरी येथून होणार असल्याने या स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी प्रख्यात गायिका मुग्धा भट सामंत,कलांगण संगमेश्वर चे आणि सुप्रसिध्द प्रवचनकार श्रीनिवास पेंडसे,मा.पं.शि.प्र.मंडळाचे अध्यक्ष आनंद साठे,जागुष्टे हायस्कूल च्या मुख्याध्यापिका सौ पूजा कात्रे,जागुष्टे हायस्कूल च्या संस्था कार्याध्यक्षा अॅड सुमिता भावे,आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
तसेच २२ रोजी दापोली येथे,दापोली,खेड,मंडणगड आदी तालुक्यांसाठी नोंदणी केलेल्या लहान व मोठ्या गटातील स्पर्धकांसाठी निवड फेरी होईल.ही निवड फेरी दापोली शहरातील लोकमान्य टिळक स्मारक मंदिर दापोली येथे दुपारी १.३० वाजता होईल.तर २४ रोजी चिपळूण,संगमेश्वर,गुहागर तालुक्यांसाठी माखजन इंग्लिश स्कूल येथे होणार आहे.लहान गटाची सकाळी ९ ते १२.३० तर मोठ्या गटाची दुपारी १.३० ते ५.३० अशी निवड फेरी होईल.
तिन्ही केंद्रावरून लहान व मोठ्या गटातून प्रत्येकी सरासरी ३-३ स्पर्धक निवडले जाणार आहेत.प्राथमिक फेरीत निवड झालेल्या स्पर्धकांची उपांत्य फेरी २४ डिसेंबरला माखजन हायस्कूल येथे होईल.तर २५ डिसेंबर ला एका शानदार कार्यक्रमांसह अंतिम स्पर्धा होणार आहे.या स्पर्धेविषयी अधिक माहिती साठी पराग लघाटे (९४२१९२९०७४) विशारद गुरव(९४०५९५३४५२)या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.स्पर्धकांनी नियोजित स्थळी वेळेपूर्वी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले आहे.











