खेड(प्रतिनिधी) दापोली विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या आजी-माजी ज्येष्ठ पदाधिकारी व युवा कार्यकर्त्यांचा मेळावा १८ ऑगस्ट रोजी सायं. ४ वा. ठाणे येथील गडकरी रंगायतन येथे शिवसेना नेते रामदास कदम व आमदार योगेश कदम यांच्या उपस्थितीत होणार आहे.
या मेळाव्याच्या नियोजनासाठी पदाधिकाऱ्यांनी आमदार योगेश कदम यांची भेट घेत चर्चा केली. याप्रसंगी संदीप भोसले, बबन मोरे, भाई यादव, माऊली मोरे, जयवंत दरेकर, सुधाकर सुर्वे, सुधीर यादव, सोहम यादव यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. या मेळाव्यास मुंबईस्थित तीनही तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.








