वाडी – वाडीत शिबीर आयोजित करून “आयुष्यमान भारत” योजनेच्या कार्डचे वितरण
कणकवली : सध्या देशभरात पाच लाखांपर्यंत मोफत उपचारासाठी आयुष्यमान भारत योजनेच्या कार्डचे वितरण करण्यात येत आहे. यासाठी सामान्य माणसांपर्यंत ह्या योजना पोहोचाव्या यासाठी वेगवेगळ्या यंत्रणांमार्फत “आयुष्यमान भारत” योजनेच्या लाभार्थ्यांना ते कार्ड अगदी मोफत काढून दिले जात आहे. तसेच ते कार्ड आपल्या असलेल्या पत्त्यावर पोस्टाने देखील पोहोच करण्यात येणार आहे, असे असताना सध्या आरोग्य विभाग, ग्रामपंचायत, राशन वितरण दुकान यासह इतर ठिकाणी या कार्डचे लाभार्थ्यांना वितरण करण्यात येत आहे.
शनिवारी हळवल भाकरवाडी येथे कळसुली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून वाडी – वाडीत शिबिराचे नियोजन करून “आयुष्यमान भारत” योजनेच्या लाभार्थ्यांना त्या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यावेळी आरोग्यसेवक गंगाधर पाटील, CHO अश्विनी तावडे, दिप्ती मोंडकर ( स्टाफ नर्स ), निलेश ठाकूर ( माजी उपसरपंच ) उपस्थित होते.
यावेळी या शिबिराचा तब्बल ४० लोकांनी या शिबिराचा लाभ घेतला तसेच काही नागरिकांनी यापूर्वी आरोग्य केंद्राने राबविलेल्या शिबिरांमध्ये कार्ड काढली असल्याची माहिती श्री. पाटील यांनी दिली. तर शिबिरावेळी कोणाला काही आजारपण असल्यास त्याची तपासणी देखील यावेळी करण्यात आली. त्यामुळे नागरिकांमधून देखील समाधानकारक प्रतिक्रिया उमटत होत्या.