विश्वचषक क्रिकेट स्पर्धा अंतिम सामना
अहमदाबाद : भारत व ऑस्ट्रेलिया या दोन संघा दरम्यान अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होत असलेल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघ प्रथम फलंदाजी करणार आहे. ऑस्ट्रेलियन संघाचा कप्तान पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. या मैदानावर सुमारे १ लाख ३० हजार प्रेक्षक प्रत्यक्ष सामन्याचा आनंद लुटणार आहेत. विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत सर्वच्या सर्व ९ पैकी ९ साखळी सामने व उपांत्य फेरीचाही सामना जिंकत अजिंक्य राहिलेला भारतीय संघ स्पर्धेचा अंतिम सामनाही सहज जिंकेल हा विश्वास तमाम भारतीय व्यक्त करीत आहेत.












