‘गझल मंथन’चे आज अखिल भारतीय महिला गझल संमेलन

खेड (प्रतिनिधी) गझल मंथन साहित्य संस्था व पुणे जिल्हा कार्यकारिणीतर्फे १९ नोव्हेंबर रोजी पुणे येथील अध्यासन केंद्र डेक्कन येथे प्रथमच अखिल भारतीय महिला गझल संमेलनाचे आयोजन केले आहे. यामध्ये जिल्ह्यातील गझलकारही सहभागी होणार आहेत.

संमेलनाध्यक्षपद इंदौरच्या गझलकार शोभा तेलन भूषवणार आहेत. उद्घाटन संगिता जोशी यांच्याहस्ते होणार असून डॉ. स्नेहल कुलकर्णी स्वागताध्यक्ष आहेत. यावेळी उर्मिला बांदिवडेकर, डॉ.
संदीप गुप्ते, किरण केंद्रे, प्रमोद खराडे, सचिव जयवंत वानखडे उपस्थित राहणार आहेत.

यावेळी ज्येष्ठ गझलकार देवका देशमुख यांचा गझलक्रांती पुरस्काराने सन्मान व गझलयात्री मालिकेतील तिसऱ्या गझलसंग्रहाचे प्रकाशन होणार आहे.

सूत्रसंचालन वैशाली माळी करणार आहेत. संमेलनात ६ मुशायरे सादर होणार असून महाराष्ट्रासह देशभरातून गझलकार सहभागी होणार आहेत. यावेळी उपस्थित रहावे, असे आवाहन गझल मंथन साहित्य संस्थेचे अध्यक्ष अनिल कांबळे यांनी केले आहे.