स्पर्धेकडे संधी म्हणून बघा :सौ मुग्धा भट सामंत

मा.पं.शि.प्र.मंडळाची गीतगायन स्पर्धा

माखजन |वार्ताहर : कोणतीही स्पर्धा ही विध्यार्थ्यांनी संधी म्हणून पहा असा सल्ला प्रख्यात गायिका मुग्धा भट सामंत यांनी दिला.त्या माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाने आयोजित केलेल्या आंतरशालेय गीत गायन स्पर्धेत निवड फेरी च्या उदघाटन कार्यक्रमात बोलत होत्या.ही निवड फेरी रत्नागिरी येथील श्रीमती राधाबाई गोपाळ जागुष्टे हायस्कुल येथे सौ योजना गांगण रंगमंचावर झाली.यावेळी व्यासपीठावर माखजन पंचक्रोशी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आनंद साठे,प्रख्यात प्रवचनकार श्रीनिवास पेंडसे,जागुष्टे हायस्कुल च्या मुख्याध्यापिका सौ पूजा कात्रे,आदी मान्यवर उपस्थितहोते.

सौ भट सामंत पुढे म्हणाल्या की,स्पर्धा ही निमित्त असते.आपल्याला पुढे जाण्यासाठी वाट दाखवत असते असे नमूद केले.यश आणि अपयश या दोन्ही चांगल्याच गोष्टी आहे हे डोळ्यासमोर ठेऊन काम करा.कारण यश हे आपली तयारी किती झाली आहे हे दाखवते.तर अपयश हे आपण आजू किती तयारी करायला हवी आहे हे दाखवत असते.त्यामुळे स्पर्धेत जिंकण,हरण अस न बघता,स्पर्धा ही करिअर ची सुरवात म्हणून पहा असा सल्ला दिला.स्पर्धा दुसऱ्याशी करण्यापेक्षा स्वतःशी करा,त्यामुळे स्वतःची उन्नती होईल असे स्पष्ट केले.

यावेळी माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाने आयोजित केलेल्या आंतरशालेय संगीत स्पर्धेच सौ मुग्धा भट सामंत यांनी तोंड भरून कौतुक केले.याप्रसंगी जागुष्टे हायस्कूल च्या मुख्याध्यापिका सौ पूजा कात्रे ,श्रीनिवास पेंडसे यांनी मनोगते व्यक्त केली.रत्नागिरी येथे लांजा,राजापूर,रत्नागिरी तालुक्यांसाठी झालेल्या निवड फेरीत लहान गटात १२ तर मोठ्या गटात २८ स्पर्धक सहभागी झाले होते.या निवड फेरीच परीक्षण विशारद गुरव,जान्हवी खडपकर, यांनी केले.तर चैतन्य पटवर्धन व निखिल रानडे यांनी सहभागी विद्यार्थ्यांना साथ दिली.यावेळी दत्ताराम गुरव,महादेव शिंदे,ओंकार मुळे,पर्यवेक्षक अंबादास घाडगे,अभिजित सहस्त्रबुद्धे,संतोष पड्यार आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरव पोंक्षे यांनी केले.

पुढील निवड फेऱ्या २२ रोजी दापोली येथे तर २४ येथे माखजन हायस्कुल येथे होणार आहे.