मंडणगड येथे स्वामी समर्थ पालखीचे आगमन भाविकांनी केली दर्शनासाठी गर्दी

मंडणगड | प्रतिनिधी : अक्कलकोट निवासी श्री. स्वामी समर्थ पालखीचे कोव्हीडनंतर प्रथमच 20 जानेवारी 2023 रोजी मंडणगड येथे आगमन झाले. यानिमीत्ताने मंडणगड नगरपंचायत व्यापारी संकुलात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. दर्शनसोहळ्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांसवेत तालुकावासीयांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. मंडणगड शहरातील दर्शन सेहळ्यानंतर पालखीने पोलादपूर येथे प्रस्थान केले.