मंडणगड | प्रतिनिधी : तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शन आणि प्रश्नमंजुषा स्पर्धेत भाग घेतलेल्या तसेच यश मिळवलेल्या शहरातील योजक इंग्लिश मिडीयम स्कूल मंडणगड शाळेतील विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा 18 जानेवारी 2023 रोजी प्रशालेत आयोजीत करण्यात आला होता. यावेळी शाळेचे कमिटी मेंबर श्रीपाद कोकाटे , प्रश्न मंजुषा स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवलेल्या दोन्ही विद्यार्थ्यांचे पालक, शाळेचा शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी उपस्थितीत होते शाळेच्या शिक्षिका आणि मुख्याध्यापिका सौ. सुषमा बांगर यांनी सगळ्यांचे शब्द सुमनांनी स्वागत करून कार्यक्रमाला सुरवात केली. तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनात सहभागी झालेले विद्यार्थी प्रथमेश त्रिपाठी ( इयत्ता ९),उमैर भाक्षे( इयत्ता ९),नील चौधरी(इयत्ता ७) यांचे पुष्प देऊन कौतुक करण्यात आले.नंतर प्रश्न मंजुषा स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवलेले विद्यार्थी नीलम मेहता ( इयत्ता ९) आणि आयुष कांबळे ( इयत्ता ९) या दोन्ही विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या पालकांचे श्री. श्रीपाद कोकाटे यांच्याहस्ते पुष्पगुच्छ आणि बक्षीस देऊन कौतुक करण्यात आले.त्यानंतर त्यांच्या मार्गदर्शक शिक्षिका सौ.धनश्री काणे यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व मार्गदर्शन केले. तसेच आयुष कांबळेचे पालक व शिक्षक श्री.कांबळे , नीलम मेहता चे पालक श्री.मेहता यांनीही विद्यार्थ्यांचे कौतुक करून पुढील वाटचालीसाठी मोलाचे मार्गदर्शन आणि शुभेच्छा दिल्या.यानंतर श्री. श्रीपाद कोकाटे यांनीही मुलांचे कौतुक केले, तसेच संबंधित शिक्षकांचे ही अभिनंदन केले. तसेच पुढील वाटचालीसाठी लागणारी सर्व मदत करणार असेही सांगितले.त्यानंतर शाळेच्या शिक्षिका आणि मुख्याध्यापिका सौ.सुषमा बांगर यांनीही विद्यार्थ्यांचे कौतुक करून कार्यक्रमाची सांगता केली