मालवण ग्रामीण रुग्णालय येथे आयोजन : तज्ञ डॉक्टर टीमकडून तपासणी
मालवण | प्रतिनिधी : भारतीय नौदल सप्ताह 2023 च्या अनुषंगाने नौदल आणि जिल्हा रुग्णालयाच्या वतीने मालवण ग्रामीण रुग्णालय येथे बुधवारी आयोजित केलेल्या मोफत रोग निदान शिबिराला नागरिकांचा प्रतिसाद मिळाला. या आरोग्य शिबिरात ७६५ नागरिकांनी लाभ घेतला.
मालवण ग्रामीण रुग्णालयात आयोजित केलेल्या या आरोग्य शिबिराचे उदघाटन आरोग्य सेवेचे उपसंचालक डॉ. प्रेमचंद कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. जिल्हा शल्य चिकित्सक श्रीपाद पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. श्रीम. सई धुरी, मालवण तहसीलदार वर्षा झालटे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुबोध इंगळे गटविकास अधिकारी अप्पासाहेब गुजर, नायब तहसीलदार गंगाराम कोकरे, आरबीएसके कॉर्डिनेटर राजेश पारधी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. श्यामराव जाधव, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय पोळ, भारतीय नौदलाचे सर्जन रिटार अडमिरल अनुपम कपुर, सर्जन कमांडर वि.ए. अरुण, सर्जन कमांडर अर्चना सिंह, अहमद जमाल, सर्जन ल. कमांडर बिस्वाजीत दास, सर्जन ल. कमांडर सुदीर शरण, मेजर सलील जेना, कप्तान संगीता, कप्तान नीखोलाम, डॉ. श्याम राणे, डॉ. मिठारी, डॉ. बोधमवाड, डॉ. सुजय निगुडकर, डॉ. गिरीष चौगुले, सर्जन डॉ. महेंद्र आचरेकर, डॉ. संदीप सावंत, डॉ. हेमा तायशेटे, डॉ. अखिल जोशी, डॉ. निखिल अवधूत, डॉ. पळसंबकर, डॉ. दळवी, डॉ. घोळवे, तालुका विस्तार अधिकारी श्री. बांगर, श्री. रणसिंग तालुक्यातील समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सेवक, सेविका, ग्रामीण रुग्णालय कट्टा, व ग्रामीण रुग्णालय मालवण येथील अधिकारी, कर्मचारी वृंद आदी उपास्थित होते.
शिबिरात मेडिसिन, सर्जरी, नाक कान घसा, डोळे विकार, दंतविकार, लहान मुलांचे विकार, त्वचा विकार, स्त्री रोग समस्या व विकार इत्यादी आजारांवर नौदलाच्या मुंबई येथील अश्विनी हॉस्पिटल मधील तज्ञ डॉक्टरांमार्फत तपासणी, रोग निदान व उपचार करण्यात आले. तपासणी अंती निवडलेल्या शस्त्रक्रिया पात्र रुग्णांना शस्त्रक्रिया सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. यावेळी आभा कार्ड, PMJAY प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे गोल्डन e कार्ड काढण्यात आली. अवयव दान प्रतिज्ञा व जनजागृती यावेळी करण्यात आली. शिबिरातील मोतीबिंदू झालेल्या रुग्णांसाठी जिल्हा रुग्णालय येथे मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आयोजित केले जाणार आहे.











