वेंगुर्ले | दाजी नाईक : सोनसुरा येथील युवा कलाकार रविराज चीपकर यांनी आज सागरतिर्थ समुद्रकिनारी कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने श्री विठ्ठलाचे सुंदर असे वाळू शिल्प साकारले आहे. हे वाळूशिल्प सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. रविराज चिपकर युवा कलाकार आपल्या कलेतून विविध वाळू शिल्पे साकारत असतो. त्यांची सर्वच वाळू शिल्पे आकर्षक व सुंदर असतात. आज रेखाटलेले हे वाळूशिल्प ही सुंदर आहे. ते पाहण्यासाठी ग्रामस्थ समुद्रकिनारी गर्दी करत आहेत.
Home ताज्या घडामोडी कार्तिकी एकादशीच्या पूर्वसंध्येला रविराज चीपकर यांनी साकारले श्री विठ्ठलाचे वाळू शिल्प..












