सहभागी होउन विनाविलंब निर्णय मिळवण्याचा लाभ घ्यावा – जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे आवाहन
रत्नागिरी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली आणि महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार ९ डिसेंबर, २०२३ रोजी रत्नागिरी जिल्हा न्यायालय तसेच तालुका न्यायालयात लोक न्यायालयाचे आयोजन करण्यात आले आहे.
या लोकन्यायालयात तडजोड सदृश फौजदारी आणि इतर सर्व प्रकारचे दिवाणी दावे तडजोडीने संपुष्टात आणण्यात येणार आहेत.
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, रत्नागिरी तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष विनायक रा. जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली हे लोकन्यायालय होणार आहे. या लोकन्यायालयात कौटुंबिक वाद, भूसंपादन नुकसान भरपाई, माेटार अपघात नुकसान भरपाई, रक्कम वसुली, सर्व प्रकारचे दिवाणी वाद, औद्याेगिक, कामगार, ग्राहक मंच यासह दूरसंचार, बॅंक, वित्तीय संस्था यांचे प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणे या लोकन्यायालयात तडजोडीसाठी ठेवण्यात आलेली आहेत. या लोकन्यायालयात पक्षकार, विधिज्ञांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव श्री. निखिल ग. गोसावी यांनी केले आहे.












