एन.एस.एस शिबीरात ‘कलाश्रम’ गट विजयी

 

 

रत्नागिरी : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विशेष निवासी श्रमसंस्कार शिबीर 16 ते 22 नोव्हेंबर या कालावधीत कुर्धे गावातील राधा पुरुषोत्तम पटवर्धन माध्यमिक विद्यामंदिर, कुर्धे येथे झाले. या शिबीराचा समारोप कार्यक्रम 22 नोव्हेंबर 2023 रोजी संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या प्रसंगी व्यासपिठावर ग्रुप ग्रामपंचायत मेर्वीचे सरपंच शशिकांत म्हादये, उपसरपंच सौ.स्वाती शिंदे, सदस्या सौ. साध्वी शिंदे, प्राचार्य डॉ. प्रफुल्लदत्त कुलकर्णी, उपप्राचार्य प्रा. सुनिल गोसावी, पर्यवेक्षक प्रा. विद्याधर केळकर, प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. उदय फडके, संतोष शिंदे, पोलिस पाटील जयंत फडके, कार्यक्रमाधिकारी निनाद तेंडुलकर, प्रा. अभिजीत भिडे, प्रा. अन्वी कोळंबेकर, प्रा. दिपा टिकेकर, डॉ. दानिश गनी, प्रा. प्रभात कोकजे, प्रा. चेतन मालशे व ग्रामस्थ प्रतिक फडके व प्रशालेतील सर्व शिक्षक उपस्थित होते.

 

या कार्यक्रमाची सुरुवात एन.एस.एस. गीताने व दीपप्रवलनाने झाली. प्रा. निनाद तेंडुलकर यांनी कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांचा परिचय करुन दिला व सर्वांचे स्वागत केले. यानंतर शिबीरार्थी स्वयंसेवकांनी आपली मनोगते व्यक्त केली यामध्ये त्यांनी गाव, ग्रामस्थ यांचे आभार मानले, केलेल्या श्रमदानाविषयी माहिती दिली, झालेल्या सत्रांची माहिती करुन दिली व शिबीरामुळे त्यांच्यात कोणते सकारात्मक बदल झाले ते सांगितले. कार्यक्रमाधिकारी मनोगत प्रा. अनुष्का टिकेकर यांनी केले. ग्रामस्थ मनोगतात संतोष शिंदे यांनी मुलांच्या शिस्तीचे कौतुक केले व मुले छोटी असुन सुद्धा त्यांनी केलेले काम ग्रामस्थांना प्रेरणादायी आहे असे विचार व्यक्त केले.

 

यानंतर मुख्याध्यापक उदय फडके यांनी मुलांना शाळेत पुन्हा शिबीरासाठी या आपलं स्वागत आहे असं सांगितलं. पर्यवेक्षक प्रा. विद्याधर केळकर व उपप्राचार्य प्रा. सुनिल गोसावी यांनी ग्रामस्थ, सरपंच, शिक्षण सुधारक समिती कुर्धे याचे सहकार्याबद्ल कृतज्ञाता व्यक्त केली. ग्रुप ग्रामपंचायत मेर्वी सरपंच शशिकांत म्हादये यांनी मुलांच्या श्रमदानाबद्दल समाधान व्यक्त केले व कौतुक केेले. विद्यार्थ्यांनी शिबीरात ग्रामीण जीवनशैलीचा अनुभव घेतला व श्रमाचे महत्त्व जाणून घेतले हे खूप कौतुकास्पद आहे असे म्हटले.

 

शिबीरात विविध स्पर्धा झाल्या त्यास्पर्धांचे 5 दिवस विविध गटांनी नियोजन गेले त्या गटातून सर्वोत्कृष्ट गट व शिबीरार्थी याचे बक्षीस वितरणाची सूत्रे प्रा. अभिजीत भिडे यांना सांभाळली. यामध्ये पुढील बक्षीसे देण्यात आली.

पथनाटय स्पर्धा विजेता – दिव्यतेज गट

डॉजबॉल विजेता – कलाश्रम गट

प्रश्‍न मंजुषा विजेता – नक्षत्र नक्षत्र

सर्वोत्कृष्ट गट – कलाश्रम गट

सर्वोत्कृष्ट श्रमदान – कुणाल कोकरे, वैभवी घवाळी

अष्टपैलु विद्यार्थी- युवराज गावडे, स्वरा पाटणकर

सर्वोत्कृष्ट गटनेता – श्रुती लिंगायत

आदर्श शिबीरार्थी – आर्यन म्हस्के, मानसी चव्हाण

आदर्श मार्गदर्शक – प्रज्ञा कांबळे

सर्व विजयी स्वयंसेवकांना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देण्यात आलं.

 

अध्यक्षीय भाषणात प्रा. डॉ. प्रफुल्लदत्त कुलकर्णी यांनी मुलांनी विविध ठिकाणी केलेल्या स्वच्छता व वनराई बंधारा बांधकामाचं कौतुक केलं. एन.एस.एस. ची स्वयंसेवक घडविण्याची परंपरा कायम राहिली आहे व यातून चांगले नागरिक निर्माण होतात व घडतात अशा नागारिकांची देशाला गरज असल्याच प्रतिपादन केलं. शाळा व ग्रामस्थांचे महाविद्यालयाच्या वतीने आभार मानले व पुढील वर्षी असेच नियोजनबध्द शिबीर गावाला पुन्हा अनुभवायला मिळेल अशी खात्री दिली.

 

या निवासी शिबीरांतर्गत श्रम संस्कारातून वनराई बंधारा, बारव स्वच्छता, समुद्र किनारा स्वच्छता, शाळा परिसर स्वच्छता करण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांच्या बौध्दिक व मानसिक विकास साधण्याच्या दृष्टिकोनातून विविध पथनाटय कार्यशाळा – सुरेंद्र जाधव, सुलेखन कार्यशाळा -प्रा. दत्तात्रय वालावलकर, टिम बिल्डिंग – प्रा. प्रभात कोकजे या कार्यशाळा तसेच भावनांची सजगता – सौ. संगिता दामले, श्रमातुन व्यक्तीमत्व विकास – श्री. जयंत फडके, तारूण्यातील महत्त्वाकांक्षा – तुकाराम गवस (मनशक्ति) बारवांचे महत्त्व श्रीरंग मसुरकर ही व्याख्याने झाली तर स्वर जिजाई हा संवाद-गीतांचा राजमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराजांवरील माहितीपर कार्यक्रम राष्ट्र सेविका समिती सादर केला. महिला मेळाव्यात डॉ. कल्पना मेहता यांनी महिलांचे आयोग्य या विषयावर माहिती दिली. कातळशिल्प व पूर्णगड किल्ला या क्षेत्रभेटी घेण्यात आल्या. विविध स्पर्धा गटश: घेण्यात आल्या यामध्ये डॉजबॉल, कौशल्स सादरिकरण, पथनाटय, उत्फुर्त वक्तृत्व इ. चे आयोजन कण्यात आले.

 

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अन्वी कोळंबेकर यांनी केले. व आभार प्रा. निनाद तेंडुलकर यांनी मानले. या शिबीराचे नियोजन प्राचार्य व उपप्राचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली एन.एस.एस. कार्यक्रमाधिकारी प्रा. निनाद तेंडुलकर, प्रा. अभिजीत भिडे, प्रा. अनुष्का टिकेकर प्रा. अन्वी कोळंबेकर व श्री. अमित कांबळे यांनी केले.