संविधान गौरव समिती मंडणगड यांच्यावतीने अमृत महोत्सवी संविधान दिनाचे निमीत्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन

मंडणगड l प्रतिनिधी : संविधान गौरव समिती मंडणगड यांच्यावतीने अमृत महोत्सवी संविधान दिनाचे औचीत्यसाधून 26 नोव्हेंबर 2023 रोजी शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह येथे स्वागत सत्कार समारंभासह विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास प्रमुख वक्ता तथा मार्गदर्शक प्रा. अँड. सर्वजित बनसोडे हे भारतीय संविधानाचे महत्व आणि वर्तमान समाज या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शांताराम पवार भुषविणार आहेत. मंडणगड मध्ये न्यायालय आणण्यात सिंहाचा वाटा असणारे अँड. मिलिंद लोखंडे यांच्या भव्य नागरी सन्मान सोहळ्याचे या कार्यक्रमाचे निमीत्ताने आयोजन करण्यात आले आहे.

 

सकाळी शहरातून बाईक आणि चार चाकी वाहनांची भव्य संविधान सन्मान रॅली ही आयोजीत करण्यात आली आहे. कार्यक्रमास राजकीय ,सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रासह .मंडणगड मधील शासकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती लाभणार आहे. दुपारच्या सत्रात संविधान आणि प्रबोधन चळवळीवर आधारित गीत गायनाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला आहे. तालुकावासीयांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संविधान गौरव समिती मंडणगड यांच्यावतीने करण्यात आले आहे.