आमदार नितेश राणे यांनी नवनिर्वाचित सर्व उपसरपंच यांचे अभिनंदन केले आहे
देवगड,कणकवली,वेंगुर्ला येथील सर्वाधीक जागांवर भाजपा
कणकवली (प्रतिनिधी) : उपसरपंच निवडीत जिल्ह्यात भाजपाचा वरचष्मा राहिला असून देवगड येथील ९ ग्रामपंचायतीपैकी ७ ग्रामपंचायती भाजपाकडे तर प्रत्येकी १ ग्रामपंचायत शिवसेना शिंदेगट , शिवसेना उबाठा गटाच्या विचारांच्या उमेदवाराची निवड उपसरपंचपदी झालेली आहे. कणकवली तालुक्यातील झालेल्या २ ग्रा.प.वर भाजपाच्याच विचारांचे उपसरपंच विराजमान झाले आहेत.कणकवली तालुक्यातील बेळणेखुर्द येथील उपसरपंच निवडीत पंढरीनाथ सोमा चाळके यांची तर ओटव ग्रा.प.च्या उपसरपंचपदी दुर्गेश रामचंद्र ओटवकर यांची निवड बिनविरोध निवड झाली आहे.
देवगड तालुक्यातील तिर्लोट ग्रा.प.उपसरपंचपदी राजन घाडी,ठाकूरवाडी-सौ.काटकर,फणसगाव-भुषण नरसाळे,पावणाई-नरेश लाड,विठ्ठलादेवी-गणेश नारकर,वानिवडे- मेघा सखणकर,शिरवली-किशोर जठार येथे भाजपा प्रणीत विचारांच्या उपसरपंचाची निवड झाली आहे. तर वळींवडे ग्रा.प.उपसरपंच पदी निलेश सावंत (शिवसेना -शिंदे गट) यांची निवड झाली आहे. तर रामेश्वर ग्रामपंचायतीत उबाठा गटाचे उपसरपंच बसले आहेत.
वेंगुर्ले तालुक्यातील वायंगणी , खानोली , मातोंड , पेंडुर या ग्रामपंचायत उपसरपंच निवडीत वायंगणी , मातोंड , पेंडुर या तिनही ग्रामपंचायतीचे उपसरपंच भाजपाचे बिनविरोध निवडून येत वेंगुर्ले तालुक्यात असलेले भाजपाचे वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.










