पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते श्री क्षेत्र मोरयाचा धोंडा याठिकाणी शासकीय पूजा संपन्न
माजी खासदार निलेश राणे यांच्याकडून पालकमंत्र्यांच्या कार्याचे विशेष कौतुक
मालवण | प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष….. ढोल ताशांचा गजर, फटाका्यांची आतिषबाजी अश्या उत्साही आणि आनंददायी वातावरणात मालवण किनारपट्टीवरील मोरयाचा धोंडा येथील किल्ले सिंधुदुर्गच्या पायभरणी सोहळ्याचा वर्धापन दिन सोहळा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते जल्लोषात संपन्न झाला. पालकमंत्री यांच्या हस्ते मोरयाचा धोंडा याठिकाणी शासकीय पूजा करण्यात आली. याचबरोबर किल्ले सिंधुदुर्ग येथील शिवराजेश्वर मंदिरातील दररोज होणाऱ्या पुजेसाठी शासकीय यंत्रणांकडून आवश्यक ते सहकार्यही उभे केले जातील, असे पालकमंत्री यांनी जाहीर केले.
350 वर्षा पासून महाराजांचा इतिहास जपण्याचे काम गावातील सर्व मंडळींनी केले. त्याच धर्तीवर राम राज्य, छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास जागृत ठेऊन देश महासत्ता दिशेने नेण्याचे काम आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत. राज्यात आपले सरकार आले आहे. माझ्या प्रत्येक निर्णयतही पाठिंबा मिळत गेला. त्यामुळेच हे सर्व शक्य होत आहे. असे सांगत पालकमंत्री यांनी सर्व विकासकामांचे श्रेय केंद्र व राज्य सरकार यांचे असल्याचे स्पष्ट केले.

दरम्यान, नेव्हीच्या माध्यमातून याठिकाणी ऐतिहासिक पणा जपत पर्यटनस्थळ विकसीत होणार आहे. याच्या आराखड्याचे सादरीकरण यावेळी दाखवण्यात आले.
यावेळी काढण्यात आलेल्या रॅलीत छत्रपती शिवाजी महराजांच्या अष्टप्रधान मंत्रीमंडळाची आणि मावळ्यांच्या आकर्षक वेशभूषा साकारण्यात आल्या होत्या. यावेळी माजी खासदार निलेश राणे, जिल्हाधिकारी किशोर तावडे, माजी आमदार प्रमोद जठार, माजी आमदार राजन तेली, प्रदेश सदस्य दत्ता सामंत, उपाध्यक्ष अतुल काळसेकर, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, उपाध्यक्ष अशोक सावंत, जिल्हा बँक संचालक बाबा परब, बाबा मोंडकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, दिपक पाटकर, गणेश कुशे, आप्पा लुडबे, भाई सावंत, राजन वराडकर, आशिष हडकर, मुख्याधिकारी संतोष जिरगे, प्रेरणोत्सव समिती अध्यक्ष गुरुनाथ राणे, दत्तात्रय नेरकर, भाऊ सामंत, राजू राऊळ, बंड्या सावंत, महेश सारंग, महेश मांजरेकर, किसन मांजरेकर, सहदेव साळगांवकर, प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुशे, तहसीलदार वर्षा झालटे,
संध्या तेरसे, ज्योती तोरसकर, पूजा करलकर, पूजा सरकारे, ममता वराडकर, वैष्णवी मोंडकर, राणी पराडकर, महिमा मयेकर, वैशाली शंकरदास, रसिका तळाशिलकर, आर. एन. काटकर, नरेश कालमेथर, हेमंत वालकर, पंकज सादये, अंजना सामंत, भाई मांजरेकर, गटविकास अधिकारी आप्पासाहेब गुजर, विकी तोरसकर, ललित चव्हाण, महेश मांजरेकर, अवी सामंत, मंदार लुडबे, सुशांत घाडीगावकर, राजू बिडये, सौरभ ताम्हणकर, राकेश सावंत, निशय पालयेकर व अन्य उपस्थित होते.
सिंधुदुर्ग किल्ल्याचे साडेतीनशे वर्षांपूर्वी २५ नोव्हेंबर १६६४ रोजी मोरयाचा धोंडा येथे छत्रपती शिवाजी महाराजांनी विधिवत भूमिपूजन केले होते. त्याच ऐतिहासिक महत्व प्राप्त झालेल्या मोरयाचा धोंडा परिसराचा आता कायापालट होणार आहे. सुमारे आठ कोटी रूपये खर्चुन याठिकाणी पर्यटनस्थळ विकसीत करण्यात येणार आहे. साडेतीनशे वर्षे समुद्र उन-पाऊस आणि लाटांचा मारा झेलत असलेल्या ‘मोरयाचा धोंडा’वर आता छत्र उभे राहत आहे. मालवणच्या पर्यटनाबरोबरच ऐतिहासिक दस्तावेजात एक नवी वास्तू या निमित्ताने समुद्रतिरी उभी राहत आहे. या वास्तूत छत्रपतींच्या विविध आठवणींबरोबरच किल्ले सिंधुदुर्ग निर्माण होत असतानाच्या अनेक संस्मरणीय नोंदी तसेच इतिहास सांगणारे म्युझियम उभे करण्यात येणार आहे. नौसेना दिन किल्ले सिंधुदुर्ग येथे होत असताना याची पायाभरणी झालेल्या स्थळावर एक इतिहास उभा राहत आहे. राज्याचे बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रयत्नाने इंडियन नेव्हीच्या पुढाकारातून यासाठी नौदलाचे कमांडर अभिषेक कारभारी, त्यांचे असिस्टंट मंगेश दळवी मेहनत घेत आहेत. एसएमपीएस कन्स्ट्रक्शनतर्फे पंकज शेलार यांनी या वास्तूची रचना केली आहे. या प्रकल्पाचे सादरीकरण यावेळी करण्यात आले.
मोरयाचा धोंडा देवस्थानमध्ये नियमीतपणे पुजाअर्चा आणि धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन सातत्याने करणारे मोरयाचा धोंडा परिसरातील बाबी उर्फ कृष्णा ढोके, बाबु जोशी, माजी सरपंच भाई ढोके, प्रकाश सावजी, सतीश चांदेरकर, बबन खोबरेकर, दामोदर तोडणकर, अशोक तोडणकर, दत्तात्रय नेरकर, देवराज जोशी, रमाकांत धुरी, नारायण तोडणकर, संजीव धुरी यांच्याबरोबर इतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. मोरयाचा धोंडा याठिकाणी पुजा करण्यासाठी असणारे पौरोहित्य करणाऱ्या भटजींची सहावी पिढी असणारे विलास अभ्यंकर यांनीच आज मोरयाचा धोंडा याठिकाणी धार्मिक कार्यक्रमात पौरोहित्य केले, त्यांचाही सत्कार पालकमंत्र्यांच्याहस्ते करण्यात आला. मोरयाचा धोंडा या ऐतिहसीक ठिकाणाचा पर्यटन विकास करण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल पालकमंत्र्यांचा स्थानिक ग्रामस्थांनी सत्कार केला. छत्रपती शिवाजी महाराजांचे सहकारी असलेल्या हिरोजी इंदुलकर यांच्या कुटुंबातील तेरावे वंशज श्रीनिवास इंदुलकर हे उपस्थित राहिले होते, त्यांचा सत्कार पालकमंत्र्यांच्याहस्ते करण्यात आला.
रामराज्य, छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास आपल्याला जपायचा आहे. अनुभवायचा आहे. इतिहास हा अनेक बलिदानांवर उभा राहिलेला आहे. हा इतिहास जिवंतपणे पुढच्या पिढीपर्यंत जाणे आवश्यक आहे. अशाप्रकारच्या कार्यक्रमातून एक संदेश युवा पिढीपर्यंत नेणे गरजेचे आहे. भारत देश एकसंघ राहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात अधिक मजबुत करण्याची वेळ आलेली आहे. गेल्या नऊ वर्षात पंतप्रधानांनी देशात निर्माण केलेला विश्वास आणि अखंड भारताचे दाखविलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री चव्हाण यांनी केले. नौदल दिनाच्या कार्यक्रमात पंतप्रधान स्वतः सहभागी होणार आहे, यातून ते नौदलाचा सन्मान करण्यासाठी येत आहेत. सिंधुदुर्गवासियांनीही नौदल दिनाच्या कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले.
मोरयाचा धोंडा देवस्थानाबद्दल छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सोबत जोडलेल्या इतिहासाची माहिती ज्योती तोरसकर यांनी दिली. पर्यटन महासंघाचे अध्यक्ष बाबा मोंडकर यांनी पालकमंत्री यांनी राजकोट आणि मोरयाचा धोंडा या ठिकाणाचा धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून विकास केल्याबद्दल आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय केनवडेकर यांनी केले.
पद्मगड, सर्जेकोटची डागडुजीही दिमाखात व्हावी : निलेश राणे
छत्रपती याशिवाजी महाराज ही आपली ओळख आहे. अभिमान आहे. महाराजांनी किल्ले सिंधुदुर्गची उभारणी करत असताना त्याच्या संरक्षणासाठी मावळ्यांच्या सुरक्षेसाठी दुरादृष्टी नजरेतून किल्ले राजकोट, पद्मगड, सर्जेकोट तसेच निवतीचा गड उभारला. राजकोटची पुनःबांधणी होत असताना किल्ले पद्मगड, सर्जेकोटचीही डागडुजी दिमाखात व्हावी. अशी मागणी माजी खासदार निलेश राणे यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे यांच्याकडे केली.
माजी खासदार निलेश राणे यांनी केले पालकमंत्र्यांचे विशेष कौतुक
पालकमंत्री म्हणून आपण तळमळीने तसेच कोणताही गाजावाजा न करता करोडो रुपयांची विकासकामे करत आहात. मी मनापासून आपले कौतुक करतो. 2014 नंतर अनेक पालकमंत्री झाले. पण आपण करत असलेले काम अतुलनीय आहे. छत्रपती याशिवाजी महाराजांच्या आठवणीपोटी, इतिहासापोटी आपण काम करत आहात, घडवत आहात. त्याबद्दल शिवप्रेमी म्हणून मी आपला आदर करतो. आपल्यासमोर नतमस्तक होतो. अशा भावना माजी खासदार निलेश राणे यांनी पालकमंत्र्यांचे कौतुक करताना व्यक्त केल्या. ओरोस येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा उभारणी नव्याने करताना पालकमंत्री यांनी दाखवलेल्या तत्परतेचा विशेष उल्लेखही निलेश राणे यांनी यावेळी केला.












