क्रिडा व कला क्षेत्रातील सर्वांना व्यासपीठ व संधी देण्याचे कार्य भाजप करीत आहे. 

नमो चषकाच्या माध्यमातून गाव पातळीवरील खेळाडू,  कलाकार राष्ट्रीय स्तरावर जातील- निलेश राणे

कुडाळ | प्रतिनिधी : क्रिडा व कला क्षेत्रातील सर्वांना व्यासपीठ व संधी देण्याचे कार्य भाजपाच्या वतीने करण्यात येत आहे, नमो चषकाच्या माध्यमातून गाव पातळीवरील खेळाडू,  कलाकार राष्ट्रीय स्तरावर जातील असे प्रतिपादन भाजपा नेते माजी खासदार व भाजपाचे कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघ प्रभारी निलेश राणे यांनी कुडाळ तालुक्याच्या ‘नमो चषक’ क्रीडा स्पर्धेतील ‘खो-खो’ स्पर्धेचा शुभारंभी प्रसंगी केले.

कुडाळ तालुक्याच्या ‘नमो चषक’ क्रीडा स्पर्धेतील ‘खो-खो’ स्पर्धेचा शुभारंभ भाजपा नेते माजी खास. निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थीतीत भाजपाचे पदाधिकारी निलेश तेंडुलकर यांच्या हस्ते पार पडला. यावेळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई,  भाजपाचे कुडाळ तालुकाध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, महीला प्रदेश सदस्य संध्या तेरसे,  माजी जि प अध्यक्ष दिपलक्ष्मी पडते, रूपेश कानडे, प्राजक्ता शिरवलकर, निलेश परब, गणेश भोगटे, राजीव कुडाळ,  चांदणी कांबळी, आबा धडाम, रेखा काणेकर, चंदन कांबळी तसेच भाजपाचे इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी निलेश राणे यांनी सांगितले की, आपल्या येथील मुलांना मध्ये कौशल्ये आहेत. त्यांच्या कडील कला,  क्रिडा गुणाना वाव मिळावा,  व्यासपीठ मिळावे या करीता भाजपाच्या वतीने नमो चषकाचे आयोजन करण्यात येत असुन या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या स्पर्धेत मोठ्या संख्येने स्पर्धकांना सहभागी करून घ्या, यातीलच खेळाडू,  कलाकार राष्ट्रीय स्तरावर चमकतील असे सांगितले.

तर यावेळी रणजित देसाई यांनी सांगितले की,  नमो चषकाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संकल्पना अंमलात आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करा, सर्व खेळाडू व कलाकार यांना नक्कीच संधी मिळणार आहे. या खो खो स्पर्धेत तालुक्यातील अनेक संघानी सहभाग घेतला होता.