वीज कोसळली ; विजेचा धक्का बसून दोघांना दुखापत ; धुरीवाडा येथील घटना…

मालवण शहारात लखलखाट गडगडाटासह मुसळधार पाऊस

मालवण | प्रतिनिधी : मालवण शहरात शनिवारी रात्री लखलखाट गडगडाटासह मुसळधार पाऊस बरसला. धुरीवाडा येथे जोगी कुटुंबीय राहत असलेल्या परिसरात एका माडाच्या झाडावर वीज कोसळून जमिनीवर धडकली. यावेळी जोरदार धक्का जाणवला. मासेमारी व्यवसायावरून आल्या नंतर घरा बाहेर असलेल्या दोघा मच्छिमारांना विजेचा धक्का बसला. सुदैवाने कोणतीही मोठी दुखापत त्यांना झाली नाही. मात्र परसरातील अनेक नागरिक विजेच्या धक्क्याने घाबरलेल्या स्थितीत होते. अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे.