खेड(प्रतिनिधी) येथील अंजुमन दर्दमंदन तालीम ओ तरक्की संस्थेच्या वतीने २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता शहरातील एम.आय.बी.गर्ल्स हायस्कूलमध्ये तालुकास्तरीय कुराण पठण (मुसाबिके कुराण) स्पर्धेचे आयोज करण्यात आले आहे.
इ. ३री ते ८वी च्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणाऱ्या स्पर्धेतील विजेत्यांना गौरवण्यात येणार आहे. स्पर्धेत भागासाठी ९३५९४६२५४६ येथे संपर्क साधावा. स्पर्धेत बहुसंख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थाध्यक्ष वजुद्दीन परकार, सचिव खलील ढोकले यांनी केले आहे.










