‘परशुराम’मध्ये महाआरोग्य मेळाव्यास प्रतिसाद

खेड(प्रतिनिधी) महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या महाविद्यालय ऑफ नर्सिंग व परशुराम रुग्णालयाच्यावतीने आयोजित महाआरोग्य मेळाव्यात ८३ रुग्णांची तपासणी करण्यात आली. शिबिरात रक्त व लघवीच्या तपासण्या करून मोफत औषधेही देण्यात आली.

परशुराम रुग्णालयातील डॉ. प्रसाद गोखले, डॉ. प्रदीप वासंबेकर, डॉ. निकिता जाधव आदींनी रुग्णांची तपासणी केली. यासाठी नर्सिंगच्या विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले. नर्सिंग महाविद्यालयातील प्रा. सृष्टी बंडबे, ऐशले फर्नांडिस यांनी या शिबिराचे नियोजन केले. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सेसचे संचालक डॉ. श्याम भाकरे, नर्सिंग महाविद्यालयाचे प्राचार्य मिलिंद काळे यांनी मार्गदर्शन केले.