चंद्रशेखर तेली (ज्योतिषी)
दिनांक २६ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजून ५३मिनिटानंतर व दिनांक २७ रोजी दुपारी १ वाजून ३५मिनिटापर्यंत कार्तिक स्वामी दर्शनाचा योग आहे.
या दिवशी कार्तिक स्वामींची विधिवत पूजा केल्यास धनप्राप्ती होते. पूजेच्या वेळी त्यांना मोरपंख अर्पण करावे .(मात्र ते घरी आणू नये असा प्रघात आहे ) चंदन, दशांगधूप ,दीप ,अर्पण करून आशीर्वाद घ्यावा. कार्तिकेय हे बलबुद्धी साहस ,विजय याचे प्रतीक मानले गेले आहे .आर्थिक अडचणीत असलेल्या व कर्जात बुडालेल्या व्यक्तींनी या दिवशी कार्तिक स्वामींचे दर्शन निश्चित घ्यावे .विशेषतः विद्यार्थी दशेतील व्यक्तींनी प्रज्ञाविवर्धिनी स्तोत्र वाचून कार्तिकेयांचे दर्शन घ्यावे. विद्या प्राप्ती आणि शैक्षणिक यशासाठी हे दर्शन खूप महत्त्वाचे असते.
ज्यांना कार्तिक स्वामींचे मंदिर फार दूर असेल व दर्शन घेता येणे शक्य नसेल अशांनी त्यांच्या फोटो समोर आपल्या मनातील इच्छा बोलून मोरपंख वाहावे. व आशीर्वादित व्हावे.











