विचारांच्या चौकटीत राहून विकासाची बांधिलकी, खा. सुनील तटकरे

मंडणगड | प्रतिनिधी : शाहू फुले आंबेडकर यांच्या बहजुन कल्याणाच्या विचारांच्या चौकटीचे वेगळेपण जपत राज्याच्या जनतेच्या पायाभुत व विकासात्मक समस्या सोडवण्यासाठी महायुतीच्या सत्तेत सहभागी झालेली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुक्यावर विशेष लक्ष देवून येथील सर्व समस्या मार्गी लावण्यासाठी कार्यरत राहणार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश अध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांनी वाल्मिकीनगर येथे 25 नोव्हेंबर 2023 रोजी विकास कामांचे भुमीपूजन कार्यक्रमानिमीत्त आयोजीत करण्यात आलेल्या जाहीर सभेत केले.

यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले सत्ता हे उपभोगाचे साधन नसून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्याचे माध्यम असल्याच्या भुमीकेतून सर्वाना न्याय देण्याची भुमीका घेऊन काम करीत असल्याचे आपले प्रश्न कोण सोडवतो? आपला माणूस नेमका कोण आहे? याची जाणीव आपण ठेवावी. पायाभुत सुविधांच्या विकासाबरोबर पर्यटनाच्या माध्यमातून स्थानीकांना रोजगार निर्मीतीसाठी काम कऱण्याची पार्टीची भुमीका व त्याकरिता भुतकाळात काम केले आहे आगामी काळातही तिच भुमीका असल्याने जनतेने भुलथापांना बळी पडू नये. वैचारीक वेगळेपण जपूनच केंद्र व राज्यशासनाच्या योजनांचा बहुजनांच्या कल्याणासाठी वापर करण्याचे आपले प्रयत्न आहेत. रायगड रत्नागिरी जिल्ह्यांना जोडणाऱ्या म्हाप्रळ आंबेत नवीन पुलांस राज्यशासनाने तातडीने निधी द्या अशी मागणी करताना रखडलेल्या बाणकोट बागमांडला पुलाचे कामाचा पाठपुरावा करणार असल्याचे यावेळी सांगीतले येथील मच्छीमार व आंबा उत्पादक शेतकरी व महिलांचे रोजगाराचे प्रश्नाकरिता राज्यशासनाच्या माध्यमातून मार्गदर्शन व वित्तपुरठ्याकरिता व्यवस्था उभी करणार असल्याचे यावेळी सांगीतले.

या कार्यक्रमास तालुका अध्यक्ष मुझफ्फर मुकादम, माजी सभापती भाई पोस्टुरे, जिल्हा बँकेचे संचालक रमेश दळवी, कॉग्रेस तालुका अध्यक्ष मुश्ताक मिरकर अजय बिरवटकर, मनोज घागरुम, अनिल रटाटे, लुकमान चिखलकर, भाई मालगुडकर, वसीम चिपोलकर, अभियंता विष्णु पवार, सरपंच नयना तबीब, सरपंच नुरुल्ला परकार, प्रकाश भुवड, सतिष दिवेकर, हेमंत सालदूरकर विश्वजीत पाटील, अशोक चोगले, यांच्यासह वेसवी वेळास पंचक्रोशीतील कार्यकर्ते व पक्षाचे समर्थकांची मोठ्या संख्येने उपस्थीती लाभली.