राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्याहस्ते तालुक्यात विविध विकासकामांचे उद्घाटन

मंडणगड | प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते तालुक्यातील आतकोल शिरगाव, देव्हारे, व वाल्मिकीनगर येथे विविध विकासकामांचे श्रीफळ वाढवून उद्घाटन कऱण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका मंडणगड यांच्यावतीने 25 नोव्हेंबर 2023 रोजी तालुक्यातील आतकोल शिरगाव येथे प्रधानमंत्री ग्राम सडक योजने अंर्तगत रस्त्याचे कामाचे श्रीफळ वाढवून उद्घाटन करण्यात आले याचबरोबर देव्हारे येथे कुडूक गोठे येथे रस्त्याचे कामाचे श्रीफळ वाढविण्यात आले.

या दोन रस्त्यांचे कामाचा निधी पाच कोटी रुपये इतका आहे. वाल्मिकीनगर येथे जलजीवन मिशन अंर्तगत गावाकरिता स्वतंत्र नळपाणी योजनेचे अडीच कोटी रुपयांचे निधी विनीयोगाचे कामाचे श्रीफळ वाढवून उद्घाटन याचबरोबर बाणकोट ते कस्टम ऑफीस रस्त्याचे कामाचे श्रीफळ वाढविण्यात आले या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष मुझफ्फर मुकादम, माजी सभापती भाई पोस्टुरे, जिल्हा बँकेचे संचालक रमेश दळवी, अजय बिरवटकर, मनोज घागरुम, अनिल रटाटे, राकेश साळुंखे, लुकमान चिखलकर, भाई मालगुंडकर, वसीम चिपोलकर, जयराम कोटेरा , नगराध्यक्षा सौ. सोनल बेर्डे, उपनगराध्यक्ष वैभव कोकाटे, नगरसेवक हरेश मर्चंडे, प्रियंका लेडें , मनिशा हातमकर , दिनेश सापटे, प्रकाश भुवड, सतिष दिवेकर, दिनेश लेंडें , रिया साळुंखे, यांच्यासह तालुक्यातील पार्टीच्या कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.

प्रतिक्रीया
खासदार सुनील तटकरे यांच्या प्रयत्नाने ठक्कर बाप्पा व जिल्हा नियोजन, जलजीवन मिशन, केंद्र व राज्यशासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून तालुक्याचे विकासास कोट्यावधी रुपयांचा निधी मंजुर झाला आहे सर्व कामे निविदा स्तर पुर्ण करुन प्रगतीपथावर आहेत., जनतेने भुलथापांना बळी न पडता खासदार सुनील तटकरे यांच्या मागे राहून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीस अधिक बळकट करावे
मुझफ्फर मुकादम अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी