महाराष्ट्र मंदिर महासंघांचेवतीने आयोजन
मंडणगड : प्रतिनिधी, दि. 07- महाराष्ट्र मंदिर महासंघ रत्नागिरी जिल्हा यांच्या माध्यमातून मंडणगड तालुक्यातील मंदिर विश्वस्तांची जागृती व्हावी या उद्देशाने शहरातील लोकनेत गोपीनाथजी मुंडे महाविद्यालयात रविवार 10 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 9.45 वाजता अधिवेशन आय़ोजन करण्यात आले आहे.
यासाठी महासंघाचे कार्यकर्ते तालुक्यातील मंदिर विश्वस्थांपर्यंत संपर्क अभियान राबवित आहेत. सत्तरहून अधिक गावांना संपर्क करण्यात आला आहे. राज्यात मंदिर संस्कृतीचे रक्षण व्हावे या उद्देशाने 2023 मध्ये मंदिर महासंघाची निर्मीती झाली आहे व तीन राज्यस्तरीय अधिवेशने झाली आहेत. राज्यातील अकारा जिल्ह्यातील पाच हजाराहून अधिक विश्वस्त मानकरी, पुजारी, अधिवक्ता मंदिर महासंघाशी जोडले गेले आहेत. मंदिरे ही हिंदू धर्माचा आधार आहेत, मंदिरांचे संघटन करणे, त्यांचे सुव्यवस्थापन करणे, मंदिरांचे सरकारीकरण रोखणे गरजेचे असल्याने राज्यव्यापी संघटन कार्य सुरु आहे. मंदिर महासंघाचे प्रबोधनानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील 60 मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागु कऱण्यात आली आहे. मंदिर महासंघाचे कार्याची तसेच गेल्या दोन वर्षात या संदर्भात केलेले कार्य व त्यास मिळालेले यश याची माहीती मंडणगड तालुक्यातील मंदिरांच्या विश्वस्तापर्यंत पोहचवण्यासाठी अधिवेशन आयोजीत करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून मंदिर महासंघ रत्नागिरी जिल्हा संघटक सुरेश शिंदे, दापोली संयोजक रमेश कडू, परेश गुजराथी, चंद्रकांत उजाळ व कार्यकर्ते तालुक्यात या निमीत्ताने प्रवास करीत असून विश्वस्तांचा उत्सफुर्त प्रतिसाद मिळत आहे. अधिवेशनात हिंदुची मंदिरांचे सरकारीकरणातून मूक्त करण्यासाठी लढा देणे, मंदिर परिसर मद्य, मांस व जुगारापासून मुक्त करणे, देवरहाटीच्या भूमी देवस्थानचे नावे कराव्यात याची मागणी कऱणे अशा महत्वपुर्ण विषयांवर उद्बोधन आणि संवाद होणार आहे. या अधिवेशानस महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राज्य संघटक संजय जोशी यांची उपस्थित लाभणार असून ते मंदिरासंदर्भातील महत्वांचे विषयांवर विश्वस्तांशी संवाद साधणार आहेत. मंडणगड तालुक्यातील सर्व व मंदिर विश्वस्तांनी अधिवेशानास हजर राहण्याचे आवाहन जिल्हा संघटक सुरेश शिंदे यांनी या निमीत्ताने केले आहे. अधिक माहीतीसाठी विश्वस्तांनी 7588902451 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.











