मालडी गावाचा ८आणि. ९ डिसेंबर रोजी गजर भावई देवीचा हरीनाम सप्ताह

मालडी (ता. मालवण)मालवण तालुक्यातील मालडी गावचे ग्रामदैवत श्री भावईदेवी चा सालाबाद प्रमाणे देवीच्या मंदिराच्या प्रांगणात शुक्रवार दिनांक ८ आणि शनिवार दिनांक ९ डिसेंबर वार्षिक हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.

 

हरिनाम सप्ताहाची सुरुवात सकाळी 10 वाजता होणार आहे. यावेळी देवीची पुजा,अभिषेक करून सारे धार्मिक विधी झाल्यावर देवीला मुकुट,साडी व दागिने घालून सजविण्यात येणार आहे.सकाळी मंत्र घोष्यात हरिनाम सप्ताह सुरू झाल्यावर देवीची आरती करून सात प्रहराचा हरीनाम सप्ताह सुरू होईल.नंतर सुहासिनी खणा नारळने देवीची ओटी भरायला सुरुवात करतील.संध्याकाळी ७ वाजल्यापासून २० ते २२ भजन मंडळे आपापले नृत्याविष्कार सुश्राव्य अभंगावर हार्मोनियमच्या तालावर आणि टाळमृदुंगाच्या ठेक्यावर सादर करतील.मध्यरात्री १२ वाजता दिंडी सोहळा होईल.९ तारीखला सकाळी ६ वाजता काकड आरती होईल त्यानंतर मालडी ग्रामस्थ भजन करतील. १० वाजता भटजीनी उत्तर पूजा केलयावर हरिनाम सप्ताहाची सांगता होईल.त्यानंतर देवालयाभोवती पाच प्रदक्षिणा होतील व नंतर महाप्रसाद दिला जाईल. तरी या नयनरम्य हरिनाम सप्ताहाचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन मालडी ग्रामस्थांनी केले आहे.