चिपळूण (प्रतिनिधी) : चिपळूण व परिसरातील नागरिकांना सातत्याने उत्तम व अत्याधुनिक वैद्यकीय सेवा सुविधा पुरविणे ही खासियत लाईफकेअर हॉस्पिटलने आजपर्यंत जपली आहे. त्याचप्रमाणे आताही एक नवीन अत्याधुनिक उपचार सुविधा लाइफकेअर हॉस्पिटल रुग्णांच्या सेवेत घेऊन आले आहे. ती म्हणजे लेसर उपचार सुविधा! लेसर उपचार म्हणजे कित्येक जटील आजारांकरिता मिळालेले वरदान आहे. परंतु सदर उपचारही लाईफकेअर हॉस्पिटल चिपळूण येथे उपलब्ध झाले पाहिजेत ही जिद्द बाळगून डॉ. इसहाक खतीब यांनी ती पूर्ण केली आहे.
ही लेसर उपचार पद्धती नक्की कोणासाठी उपयुक्त/वरदान ठरणार आहे? त्याद्वारे कोणकोणत्या आजारांवर उपचार करण्यात येतील? व्हेरिकोज व्हेन्स- म्हणजे काय? आपल्या पायात अशुद्ध रक्त वहन करण्यासाठी त्वचेच्या खाली असलेल्या दोन मोठ्या रक्तवाहिन्यांमध्ये जर कुठल्या कारणाने रक्त जमा झाले आणि त्यामुळे त्या फुगीर झाल्या तर या त्रासाला व्हेरिकोज व्हेन्स (varicose veins) असे म्हणतात. अनेकदा या रक्तवाहिन्या पायाच्या पृष्ठभागावर ठळकपणे दिसू लागतात. तर काहीवेळा रक्तवाहिन्या दिसत नसल्या तरी व्हेरिकोज व्हेन्सचा त्रास असू शकतो. त्यासाठी अन्य लक्षणांचा आढावा घेणे आवश्यक असते. जास्त वेळ उभे राहिल्याने वा बसल्याने शीरांमध्ये ताण निर्माण होतो व शीरांमधील पडदे निकामी होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे अधिक रक्त जमा झाल्यामुळे शीरा फुगतात व व्हेरिकोज् व्हेन्सचा त्रास उद्भवतो. पाय सुजणे, संध्याकाळी पाय दुखणे, पायामध्ये असहजता निर्माण होणे, असह्य वेदना होणे व त्यामुळे झोप न येणे, पायाच्या पोटऱ्या दुखणे ही प्रमुख लक्षणे आहेत. निळ्या नसा फुगलेल्या दिसतात, क्वचित पाय देखील काळवंडलेला असतो. विशेषतः घोट्याच्या वरचा भाग काळवंडलेला असतो. कधी कधी अल्सर अथवा जखम निर्माण होते व ती भरून निघत नाही.
व्हेरिकोज व्हेन्सच्या शंभर टक्के निदानासाठी ‘डॉपलर स्कॅन’ करण्याचा सल्ला दिला जातो. व्हॅरिकोज व्हेन्ससाठी लेसर थेरपीमध्ये लेसरच्या सहाय्याने व्हेरिकोज व्हेन्सना उष्णता दिली जाते, त्यामुळे त्या आकुंचन पावतात. पारंपरिक व्हेरिकोज व्हेन्स शस्त्रक्रियेच्या तुलनेत प्रगत लेसर उपचार घेणे अधिक फायदेशीर आहे. लेसर उपचारांमुळे व्हेरिकोज व्हेन्ससाठी कायमस्वरूपी स्टोकिंग्ज वापरण्याची गरज उरत नाही. मूळव्याध म्हणजे गुदाशय आणि गुदद्वाराजवळ असलेले मोड. हे मोड म्हणजे मोठ्या झालेल्या रक्तवाहिन्या जे गुदद्वाराच्या आत किंवा त्याच्या बाजूनेही असू शकतात.
लक्षणे पुढील स्वरूपाची असतात – शौचानंतर रक्तस्त्राव हे रक्त लालभडक रंगाचे असते, गुदद्वाराजवळ खाज, वेदना मूळव्याध होण्याची कारणे: आहारात तंतुमय पदार्थांची कमतरता असल्यामुळे बद्धकोष्ठता होते आणि त्यामुळे शौचाला कायम जोर करण्यामुळे व कुंथण्यामुळे मूळव्याध होतो. तसेच फिशर म्हणजे गुदद्वाराच्या खालच्या बाजूला त्वचेजवळ जखम होणे/ चीर पडणे. कठीण शौच असेल तर गुदाशयाच्या आतील नाजूक आवरणावर दाब पडून किंवा पातळ शौचाच्यावेळी जोर केल्यामुळे फिशर होते. फिशरची लक्षणे कोणती आहेत? वेदना: शौचाच्या वेळी व शौचानंतर वेदना अतिशय तीव्र होतात. रक्तस्त्राव: शौचाच्यावेळी त्या जखमेतून रक्तस्त्राव होऊ शकतो.
अतिरिक्त त्वचा- काही वेळा फिशरजवळ किंवा त्याभोवती सूज येऊन अतिरिक्त त्वचा तयार होते व लटकू लागते. बरेचदा यातून चिकट स्त्राव येतो आणि त्यामुळे त्वचा खरचटल्यासारखी होते व खाजते. फिश्चुला म्हणजे गुदद्वाराजवळ असणाऱ्या ग्रंथींमध्ये जंतुसंसर्ग होऊन त्यामध्ये पू साचतो व जेव्हा ती भरलेली गाठ आपोआपच फुटते तेव्हा ती बाहेर त्वचेवर एक छिद्र बनवते आणि तसेच छिद्र मलाशयामध्येही तयार होते. ही दोन्ही छिद्रे एका गुहेसारख्या मार्गाद्वारे आपसात जोडलेली असतात. या दोन तोंडाच्या व्रणालाच ‘फिश्चुला’ असे म्हणतात. लक्षणे: गुदद्वाराजवळ छिद्र तयार होऊन त्यातून स्त्राव/पू येणे. तसेच पायलोनीडल सायनस, ऍनल पॉलीप या विविध आजारांबाबत शस्त्रक्रियया केली तरी ते वारंवार उद्भवण्याची शक्यता असते. मग अशा वेदनादायी उपचारनऐवजी उपचार करण्याची एक सोपी, कमी त्रासाची उत्तम पद्धत/प्रणाली म्हणजे लेसर थेरपी होय. लेसर थेरपीचे सर्वसाधारण फायदे खालीलप्रमाणे- कमीतकमी रक्तस्त्राव आणि वेदना: लेसर शस्त्रक्रियेदरम्यान कमीतकमी रक्तस्त्राव होतो आणि शस्त्रक्रियेनंतर वेदना कमी होतात कारण लेसर केवळ विशिष्ट क्षेत्राला लक्ष्य करते. सुधारित अचूकता: लेझर शस्त्रक्रिया आजूबाजूच्या ऊतींचे नुकसान न करता लहान भागांना लक्ष्य करून अचूकता प्रदान करते. लेसर शस्त्रक्रिया ही कमी वेळात पूर्ण होणारी दे केअर उपचार पद्धती आहे. तसेच कमीतकमी वेळात सुधारणा होते. थोडक्यात लेसर थेरपी म्हणजे कमीतकमी वेदना देणारे, लहान जखम, वेगवान सुधारणा कालावधी, अत्यल्प रक्तस्त्राव इतके सगळे फायदे देणारी उपचार पद्धती आहे. तसेच शस्त्रक्रिया यशस्वी होण्याचे प्रमाणही जास्त आणि चांगले आहे. इतकी अत्याधुनिक सुविधा आपल्या लाईफकेअर हॉस्पिटल मध्येच उपलब्ध होणे ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे व त्याचा लाभ जास्तीत जास्त रुग्णांनी घ्यावा, असे आवाहन हॉस्पिटलचे मॅनेजिंग डायरेक्टर व जनरल सर्जन डॉ. इसहाक खतीब यांनी केले आहे.










