चिपळूण : दिनांक २५.११.२०२३ रोजी सांयकाळी ०५.४५ च्या सुमारास वनक्षेत्रपाल चिपळूण यांना दुरध्वनीव्दारे मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने परिक्षेत्र वन अधिकारी चिपळूण, वनपाल चिपळूण, वनरक्षक कोळकेवाडी यांनी तात्काळ मौजे ओवळी ता.चिपळूण येथील ओवळी फाटा येथे जावून, ओवळी फाटा येथे थांबलेल्या पिक अप क्रमांक- MH-०८-W-९३९३ ची तपासणी केली असता. गाडीच्या हौद्यामध्ये विनापासी, बिगरशिक्का असलेला खैर (साड) लाकूडमाल आढळून आला. वनरक्षक यांनी हौद्यातील खैर लाकूडमाल मोजमापे घेवून, सदरचा लाकूड माल व गाडीमधील लोंखडी वजनकाटा व वजन मापे गाडीसह जप्त करुन ताब्यात घेतले.
सदर प्रकरणी वनरक्षक कोळकेवाडी यांचे कडील अपराधाचे पहिले प्रतिवृत्त क्रमांक -०८/२०२३ दि.२५/११/२०२३ अन्वये वाहनचालक श्री. यतिराज तुकाराम होडे रा. वेहेळे व श्री.दिलीप बाब्या पवार रा. ओवळी यांचे विरुध्द भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम ४१ (२) (ब) अन्वये गुन्हा नोंद केला. सदर प्रकरणी पुढील तपास परिक्षेत्र वन अधिकारी चिपळूण यांचे मार्गदर्शनाखाली वनपाल चिपळूण, वनरक्षक कोळकेवाडी करत आहेत.
सदरची कार्यवाही विभागीय वन अधिकारी रत्नागिरी (चिपळूण) दिपक खाडे, सहाय्यक वनसंरक्षक (प्रा.) रत्नागिरी (चिपळूण) श्री. वैभव बोराटे यांचे मार्गदर्शनाखाली श्रीम. राजश्री कीर, वृक्ष अधिकारी तथा परिक्षेत्र वन अधिकारी, श्री.दौ.रा. भोसले, वनपाल चिपळूण, श्री. राहुल गुंढे, वनरक्षक कोळकेवाडी यांनी पार पाडली आहे.










