‘त्या’ फसवणूक प्रकरणी संशयितांचा जामीन न्यायालयाने फेटाळला

खेड | प्रतिनिधी : खेड शहरातील गुलमोहर पार्क येथील बँकेकडे गहाण ठेवलेली जमिन व त्या जमिनीमध्ये असणारे घर विकून फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या चौघांचा अटकपूर्व जामीन येथील अतिरीक्त सत्र न्यायालयाने फेटाळला आहे.
या प्रकरणी  मंजु गौतम जैन (४८, व्यवसाय ज्वेलरी शॉप, रा. गुलमोहर पार्क, खेड, जि. रत्नागिरी) यांनी पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी पोलिसांनी नफिसा हशमत परकार (रा. कर्जी, आमशेत ता. खेड जि. रत्नागिरी), महनिफ हमजा मुल्ला (रा. निळीक ता. खेड, जि. रत्नागिरी) व जावेद युसुफ परकार (रा. गुलमोहर पार्क ता. खेड जि. रत्नागिरी) यांनी या मिळकतीवर बँक ऑफ महाराष्ट्रचा बोजा असल्याची बाब जाणीवपूर्वक  फसवणुक करण्याच्या इराद्याने लपवुन ठेवून मंजु जैन यांना ही स्थावर मालमत्ता  सुमारे ३० लाख ८४ हजार ५०० रुपयांना विकून  फसवणूक केल्याप्रकरणी २ नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल केला होता. फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर तिघा संशयितांनी खेड येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी अर्ज दाखल केला होता.
या अर्जावर २७ रोजी न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी फिर्यादी तर्फे ॲड. पुनम जाधव यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून संशयितांचा जामीन फेटाळला आहे.