4 डिसेंबर रोजी लोकशाही दिन

रत्नागिरी : जिल्हास्तरावर दर महिन्याला पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाचे सभागृहात जिल्हास्तरीय लोकशाही दिन साजरा होतो. माहे डिसेंबर 2023 चा लोकशाही दिन सोमवार 4
डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी 1 ते 2 वाजता या वेळेत होणार आहे.

लोकशाही दिनाकरिता नागरिकांनी प्रथम तालुका लोकशाही दिनात अर्ज सादर करणे बंधनकारक
आहे. तालुका लोकशाही दिनातील उत्तराने नागरिकांचे समाधान न झाल्यास जिल्हास्तरीय लोकशाही दिनात
अर्जदार अर्ज सादर करु शकतात, असे उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) शुभांगी साठे यांनी कळविले आहे.