चिपळूण (प्रतिनिधी) : तालुक्यातील नांदगाव येथे दि.२६ रोजी रात्री ७ ते दि. २७ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजण्याच्या मुदतीत दारु पिण्यासाठी गेलेला रमेश रामचंद्र भुवड याचा विहिरीत पडून मृत्यू झाला. यातील मयत रमेश रामचंद्र भुवड (रा. नांदगाव) हा दारुचा व्यसनी असून दि. २६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता रमेश हा दारु पिण्यास गेला, तो घरी परत न आल्याने वाडीतील लोक व इतर नातेवाईक त्यांचा शोध घेत असताना तो नांदगावात विहिरीच्या पाण्यात मयत स्थितीत मिळून आला. सावर्डे पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.












