महाराष्ट्र संघाच्या कर्णधारपदाला साजेशा खेळ करीत जिंकली मने
सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडीचा सुपुत्र आणि सिंधुदुर्ग जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा खेळाडू निखिल नाईक हा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या विजय हजारे चषक एकदिवशीय स्पर्धेमध्ये पुनरागमन करताना अप्रतिम कामगिरी करत आहे.
बुधवारी मेघालय बरोबरच्या सामन्यात निखिल नाईकची महाराष्ट्र संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली. यावेळी त्याने कर्णधारास साजेसा खेळ करत नाबाद ७१ धावांची खेळी करीत संघाला विजय मिळवून दिला.
यापूर्वी झालेल्या ३ सामन्यातील पहिल्या झारखंड बरोबरच्या सामन्यात नाबाद सामन्यात ६० चेंडूमध्ये ६ चौकार आणी ४ षटकारांच्या मदतीने नाबाद ८२ धावा करून संघाला विजय मिळवून दिला. तर तिसऱ्या सामन्यात विदर्भ बरोबर ३२ चेंडूत नाबाद ४७ धावांची महत्वपूर्ण खेळी केली.
निखिल नाईक याने यापूर्वी झालेल्या मुश्ताक आली टी – २० स्पर्धेतदेखील अप्रतिम कामगिरी केली आहे. त्याने यावर्षी रणजी सामन्यातून पदार्पण करावे अशी शुभेच्छा सर्व स्तरातून व्यक्त होत आहे.












