अक्षता कलशाचे कणकवली येथील पटवर्धन चौकात पूजन करून आर्या दुर्गा मंदिर पर्यंत काढण्यात आली बाईक रॅली

कणकवली : अयोध्या येथील राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण देण्यासाठी विश्व हिंदू परिषदे मार्फत कणकवलीत गुरुवारी अक्षता कलश आणण्यात आला. या कलशाचे येथील पटवर्धन चौकात पूजन करून आर्या दुर्गा मंदिर पर्यंत बाईक रॅली काढण्यात आली. हा अक्षता कलश आर्या दुर्गा मंदिरात ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर हा कलश जिल्ह्यातील प्रत्येक गावोगावी जाऊन नागरिकांना उद्घाटनासाठी येण्याचे निमंत्रण देण्यात येणार आहे.

 

या बाईक रॅलीमध्ये अक्षता कलश यात्रेचे संयोजक आनंद प्रभू, विश्व हिंदू परिषदेचे नंदकुमार आरोलकर, रविकांत राणे, प्रसाद राणे, भारतीय महासंघाचे जिल्हाध्यक्ष विकास गुरव, कार्याध्यक्ष भगवान साटम, एसटी अनुसूचित जाती जमातीचे भाजप जिल्हाध्यक्ष नामदेव जाधव, भाजपा तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, संतोष कानडे, शहराध्यक्ष अण्णा कोदे, समीर प्रभूगावकर, प्राची कर्पे, साक्षी वाळके यांच्यासह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.