आता कोकणी माणसाची फसगत, विश्वासघात होणार नाही : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

रत्नागिरी | प्रतिनिधी : कोकणी माणसाने शिवसेना आणि बाळासाहेबांवर भरभरून प्रेम केले पण त्यांना काय मिळाले ? येणाऱ्या प्रत्येक प्रकल्पाला केवळ विरोध झाला. मात्र आता कोकणी माणसाची अशी फसगत, विश्वासघात होणार नाही असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकांशी बोलताना केले.

रत्नागिरी दौर्यावर मुख्यमंत्री आले असता त्यांनी हे उद्गार काढले. कोकणातील तरुणांना रोजगारासाठी मुंबई पुणे येथे जावे लागू नये, त्यांना इथेच नोकर्या मिळाव्या यासाठी छोटे छोटे प्रकल्प कार्यान्वित करण्यात येत आहेत, ग्रीन फिल्ड एक्प्रेस वे, कोकण विकास प्राधिकरण कार्यान्वित होणार आहे. कोकणात उद्योग येत आहेत, रोजगार येत आहे, रस्ते होत आहेत कोकण विकासावर सरकारचा फोकस आहे असेही ते म्हणाले.

कोकणी माणसाने बाळासाहेब आणि शिवसेनेवर भरभरून प्रेम केले परन्तु त्यांना काय मिळाले असे सांगत आता त्यांची फसगत, विश्वासघात करणार नाही, कोकणासाठी जेव्हढ करता येईल तेव्हढ करू, सध्या आवश्यकता नाही पण गरज असेल तर मंत्रिमंडळ बैठक इथे घेऊ असेही ते म्हणाले.