रत्नागिरी :- जिल्ह्यातील सर्व ८४७ ग्रामपंचायतींमध्ये १७ सप्टेंबर रोजी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत विभाग) सागर पाटील यांनी दिली.
ग्रामसभांचे अध्यक्षस्थान संबंधित ग्रामपंचायत सरपंच भूषवणार असून विविध विकासात्मक समित्या यात सहभाग घेणार आहेत. या ग्रामसभेत गावातील विकासकामांचा आढावा घेऊन शासनाची लोकाभिमुखता, ग्रामपंचायतीच्या कामकाजातील पारदर्शकता याबरोबरच माती-पाणी संवर्धन, स्वच्छता, जैवविविधतेचे व्यवस्थापन, शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्रांची प्रगती यावर चर्चा होणार आहे.
याशिवाय केंद्र व राज्य शासनाच्या विविध विभागांच्या योजनांना चालना देण्याच्या दृष्टीनेही ही ग्रामसभा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी या सभेला हजेरी लावावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे













