एमइएस कॉलेज ऑफ नर्सिंगच्या विद्यार्थ्यांकडून एड्स आजारा संदर्भात जनजागृती

चिपळूण (वार्ताहर) : लाईफकेअर हॉस्पिटल मार्फत एमइएस कॉलेज ऑफ नर्सिंग स्टुडन्ट यांच्या सहकार्याने हॉस्पिटलच्या प्रांगणामध्ये जागतिक एड्स दिनानिमित्त एड्स या आजारा संदर्भात जनजागृती करण्यात आली.

यावेळी लाईफ केअर हॉस्पिटलचे डॉ. वसीम खतीब, मुसा पिरजादे, संदेश यादव, डॉ. शाहिद परदेशी, लाईफ केअरचे जनसंपर्क अधिकारी अभिजीत सुर्वे, लाईफ केअर हॉस्पिटलचे सर्व कर्मचारी व एम एस कॉलेजच्या शिक्षिका प्रतीक्षा सूर्यवंशी, मधुरा रिसबुड यांचे मोलाचं सहकार्य लाभले.