चिपळूण (प्रतिनिधी) : के.एम. अग्रवाल महाविद्यालय, कल्याण येथे दि. २७ नोव्हेंबर रोजी झालेल्या महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघाच्या निवडणुकीमध्ये अनिल कलकुटकी यांची उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. अनिल कलकुटकी यांनी आत्तापर्यंत डीबीजे कॉलेजच्या शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे युनिट प्रमुख म्हणून काम केले असून अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संघ मुंबईच्या २१ वर्षे उपाध्यक्षपदी कार्यरत होते. तसेच महाराष्ट्र राज्य महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचारी महासंघाच्या कार्यकारणीमध्ये ५ वर्ष रत्नागिरी जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम केले आहे.
चिपळूण येथे अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संघाचे २८ वे वार्षिक अधिवेशन दि. २९जानेवारी २००६ रोजी संपन्न झाले तसेच डीबीजे महाविद्यालयात महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघाचे १२ वे त्रेवार्षिक अधिवेशन दि. २७ व २८ ऑक्टोबर २०१८ रोजी संपन्न झाले. सदर अधिवेशनास राष्ट्रीय नेते शरद पवार उपस्थित होते. या दोन्ही अधिवेशनाचे संयोजन अनिल कलकुटकी यांनी केले होते. याबद्दल एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन मंगेश तांबे, प्राचार्य डॉ. बापट, नियामक समिती सदस्य, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, मैत्रीग्रुपचे सदस्य या सर्वांनी अभिनंदन केले. उपप्राचार्य डॉ.चांदा, संतोष वाघे, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.











