पाचव्या टी – २० सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियावर रोमहर्षक विजय

मालिकाही ४-१ जिंकत घेतला बदला
बेंगळुरू : पाचव्या व शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेलियावर रोमहर्षक विजय मिळवित भारतानं ५ सामन्यांची मालिका ४-१ अशी जिंकली. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच टी २० सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा सामना खेळला गेला. बेंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर हा सामना झाला. या सामन्यात टीम इंडियानं ६ धावांनी विजय मिळवला आहे. प्रथम फलंदाजी करताना भारतानं निर्धारित २० षटकांत १६०-८ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाचा संघ २० षटकात ८ गडी गमावून १५४ धावाच करू शकला. या मालिका विजयाने भारताने विश्वचषक स्पर्धेतील पराभवाचा वचपा काढला.