युनिटेक कॉम्प्युटर एज्युकेशन सेंटर, शृंगारतळीचा एमकेसीएल तर्फे गौरव

पाटपन्हाळे (वार्ताहर) रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एमकेसीएलच्या सर्व अधिकृत प्रशिक्षण केंद्रांची विभागीय बैठक (Regional Meeting) शनिवार दि. ०२ डिसेंबर रोजी रत्नागिरी येथे संपन्न झाली.

गुहागर तालुक्यातील शृंगारतळी सारख्या ग्रामीण भागात युनिटेक कॉम्प्युटर एज्युकेशन सेंटरने MKCL च्या विविध कोर्सेसच्या माध्यमातून वर्ष २०२३ मध्ये आपल्या परिसरात संगणक साक्षरता आणि संगणकावर आधारित रोजगाराभिमुख व्यावसायिक प्रशिक्षणामध्ये भरीव कामगिरी केली आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व रोजगारक्षम युवा पिढी निर्मितीसाठी आणि इंडस्ट्री-रेडी असे कोर्सेस चालवून विद्यार्थ्यांना सक्षम करत आहे. सततच्या व सुसंगत प्रयत्नांमुळे विद्यार्थ्यांना डिजिटल विश्वात प्रगती साधण्याचा आत्मविश्वास प्राप्त झाला आहे. युनिटेक कॉम्प्युटर सेंटर च्या माध्यमातून आजवर हजारो विद्यार्थ्यांना माहिती तंत्रज्ञानाचा (MS-CIT, Tally, DTP, Advanced Excel, Pragramming, Cyber Security, AI, Robotics, Python, Auto Cad, Soft Skills, Diploma Courses) चा सखोल परिचय व प्रशिक्षण पूर्ण करून दिले व त्यामुळे त्यांना डिजिटल विश्वात प्रगती साधण्याचा आत्मविश्वास प्राप्त झाला. तसेच या केंद्रामधून शिकलेले बरेच विद्यार्थी आज विविध ठिकाणी नोकरी व व्यवसाय करीत आहेत. युनिटेक कॉम्प्युटरच्या या भरीव योगदानाबद्दल एमकेसीएलच्या व्यवस्थापकीय संचालिका मा.विना कामत मॅडम यांच्या हस्ते केंद्र संचालक प्रा. जहूर बोट यांना मा.अतुल पतोडी,अमित रानडे, विकास देसाई, नटराज कटकदोंड,जयंत भगत,मंगेश जाधव, संतोष कोलते, प्रणय तेली आदी मान्यवरांच्या उपस्थितीत गौरविण्यात आले. तसेच युनिटेक कॉम्प्युटर एज्युकेशन सेंटर मधील सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून भविष्यातील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

युनिटेक कॉम्प्युटर एज्युकेशन सेंटरच्या या गौरवाबद्दल व यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.