भिले येथील कार्यक्रमात आ. शेखर निकम यांची ग्वाही
विविध विकासकामांचे भूमिपुजन
चिपळूण (वार्ताहर) : चिपळूणच्या खाडीपट्ट्यातील गावागावातून विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे, त्यातून असंख्य विकासकामे मार्गी लागली आहेत. आता यापुढे इथला तरूण आर्थिक दृष्टद्या सक्षम करण्याबरोबरच खाडीपट्ट्याच्या पर्यटनदृष्ट्या विकासासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन आमदार शेखर निकम यांनी केले.
खाडीपट्ट्यातील प्रत्येक गावाला आमदार निकम यांच्या माध्यमातून कोट्यवधीचा निधी प्राप्त झाला असून त्यातून असंख्य विकासकामे मार्गी लागत आहेत. यातूनच शनिवारी बिवली, भिले, करंबवणे गावातील कोट्यवधींच्या विकासकामांची भूमिपूजने आ. निकम यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी भिले ग्रामपांयत कार्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. आ. निकम पुढे म्हणाले की, खाडीपट्ट्यातील गावांना मोठी अशी खाड़ी लाभली आहे. येथील परिसरही नित्तांत सुंदर आहे. येथे पर्यटनालाही मोठा वाव आहे. मात्र लोटेतील कारखान्यांच्या सांडपाण्यामुळे येथील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत मध्यंतरी पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्यासह जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्याबरोबर मच्छिमार समाजाच्या बैठका होऊन या प्रश्नाची सोडवणूक कशी होईल त्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. भिले गावाच्यादृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या खारभूमी बंधारा दुरूस्तीसाठी ८० लाखांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. बौद्धवाडी येथे गंगाराम सकपाळ यांच्या घराजवळ संरक्षक र्मित, जांभळी बंदर रस्ता डांबरीकरण, मधलीवाडीत पाखाडी, बोडकणी ते ढाकरवाडी रस्त्ता, सुतारवाडी विश्वकर्मा मंदिर सभामंडप, बुद्ध विहाराला संरक्षक भिंत, सुतारवाडीत अंतर्गत गटार अशी एकूण १ कोटी १९ लाखांचा निधी दिला आहे. त्याबरोबर भिले लाड दुकान ते बिवली रस्त्यासाठी ३० लाख निधी देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी सरपंच अदिती गुढेकर, उपसरपंच उमेश सकपाळ यांनी आमदार निक्रम याचा सत्कार केला, विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती झालेल्या राजेंद्र काणेकर यांचा सत्कार निकम यांच्याहस्ते करण्यात आला.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्या मीनल काणेकर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष आबू ठसाळे, काँग्रेस उपसभापती पांडुरंग माळी, बिवलीचे बाबू वाजे, ग्रामपंचायत सदस्य विद्या सकपाळ, श्रावणी गुरव, मंगेश भुवड, सुनील सुतार, श्यामल निगडे, अजय घाग, भिलेचे माजी सरपंच धनंजय केतकर, सुभाष गुढेकर, रामकृष्णा कदम, सोमा गुढेकर, प्रभाकर सैतवडेकर, दिलीप कुळे, तंटामुक्त समिती अध्यक्ष गजानन भुवड, दत्ताराम घरवे, कालुराम सकपाळ, रमेश तलगे, ग्रामसेविका अरुणा राठोड आदी उपस्थित होत्या.











