पाखाडी पूर्णत्वासाठी आमरण उपोषण

खेड(प्रतिनिधी) तालुक्यातील बिजघर-टाकेवाडी येथे बांधण्यात आलेल्या पाखाडीचे काम अपूर्णावस्थेत आहे. येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी अपूर्णावस्थेतील पाखाडीच्या कामाची पाहणी करून तातडीने काम पूर्ण करण्यासाठी २५ हून अधिक ग्रामस्थांनी आमरण उपोषणाचा पत्करला .

अपूर्णावस्थेतील पाखाडीच्या कामाच्या पूर्ततेसाठी ग्रामस्थांनी ऑक्टोबरमध्येही पंचायत समितीसमोर उपोषण छेडले होते. आमदार योगेश कदम यांनी याप्रश्नी अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेत पाखाडीचे काम पूर्ण करत ग्रामस्थांची गैरसोय दूर करण्याबाबत सूचित

केले होते. मात्र नोव्हेंबर महिना लोटूनही आमदार योगेश कदम यांच्या सूचनेची अद्याप दखल न घेतल्याने अखेर ग्रामस्थांनी आमरण उपोषण सुरू केले आहे.

उपोषणात बिजघर तंटामुक्तीचे सदस्य शांताराम दोडेकर, तुकाराम भोसले, संतोष कदम, सुधीर भोसले, सुरेश जड्याळ, मयूर भोसले, रूपेश दोडेकर यांसह अन्य ग्रामस्थांचा समावेश होता.