खेड मधून दुचाकी चोरीस , दोघांवर गुन्हा 

खेड(प्रतिनिधी)खेड शहरातील गजबजेल्या ठिकाणी असलेल्या अनिकेत शॉपिंग सेंटर येथून ४० हजार रुपये किंमतीची दुचाकी २ डिसेंबर रोजी सांयकाळी ७ वाजण्याच्या सुमारास चोरीस गेली होती ही दुचाकी रविवारी आंबये येथे आढळून आली असून दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे

 

रुपेश दशरथ चव्हाण यांच्या मालकीची हिरो कंपनीची पॅशन प्रो मोटार सायकल क्र.एम.एच. ०८ ए.डी/८७३२ ही दुचाकी अनिकेत शॉपिंग सेंटर येथे हँडल लॉक न करता उभी करून ठेवली असता दोघांनी ही दुचाकी चोरून नेली होती

 

दरम्यान ही दुचाकी आंबये या ठिकाणी आढळून आली दुचाकी चोरणारे दोघे पोलिसाच्या हाती लागले असून त्यांच्यावर येथील पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे