कुंभार्ली घाटात पिकअपची एसटीला धडक

रत्नागिरी | प्रतिनिधी

कुंभार्ली घाटात ओव्हरटेक करण्याच्या नादात पिकअप गाडीची एसटीला धडक बसून अपघात झाला.ही घटना रविवार 3 डिसेंबर रोजी सायंकाळी 4 वा.घडली.

याप्रकरणी पिकअप चालक शबीर शफिक शमशुद्दीन शेख विरोधात अलोरे-शिरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्याच्या विरोधात प्रकाश पांडुरंग कदम यांनी तक्रार दिली आहे.त्यानुसार,रविवारी सायंकाळी शबीर शेख आपल्या ताब्यातील अशोक लेलँड पिकअप गाडी (एमएच-50-एन-2982) घेउन कुंभार्ली घाटातील वळणात पुढील वाहनाला ओव्हरटेक करुन जात होता.त्याच सुमारास प्रकाश कदम आपल्या ताब्यातील एसटी स्लिपर सिटर (एमएच-09-एफएल-1062) घेउन समोरुन येत असताना शबीर शेखचा पिकअप वरील ताबा सूटल्यामुळे त्याने समोरुन येणार्‍या एसटीला धडक देत अपघात केला.यात एसटीची प्रथमदर्शनी काचेला तडा गेला आहे.तसेच उजव्या बाजुला हेड लाईट आणि साईडचा आरसा फूटून नुकसान झाले आहे.याप्रकरणी पिकअप चालकाविरोधात अलोरे-शिरगाव पोलसि ठाण्यात भादंवि कायदा कलम 279 आणि मोटार वाहन कायदा कलम 184 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.