रत्नागिरी | प्रतिनिधी : तालुक्यातील संगमेश्वर-साळकोंड येथे बेदरकारपणे एसटी चालवून समोरुन येणार्या मिनी बसला धडक देत अपघात केला.अघाताची ही घटना रविवार 3 डिसेंबर रोजी सकाळी 8.45 वा.घडली.
अण्णा बाळासाहेब थोरात असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या एसटी चालकाचे नाव आहे.त्याच्या विरोधात पर्शुराम कृष्णा पवार यांनी संगमेश्वर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.त्यानुसार,पर्शुराम पवार हे आपल्या ताब्यातील मिनी बस (एमएच-43-एच-4410) मधून लग्नाचे वर्हाड घेउन प्रवास करत डिंगणी ते संगमेश्वर असे जात होते.त्याच सुमारास एसटी चालक अण्णा थोरात आपल्या ताब्यातील एसटी (एमएच-सीयु-6922) घेउन भरधाव वेगोन समोरुन येत होता.ही दोन्ही वाहने साकळकोंड येथे आली असता थोरातचा भरधाव एसटीवरील ताबा सूटला आणि रस्त्याच्या विरुध्द दिशेला जात एसटीची मिनी बसच्या उजव्या बाजुला धडक बसून हा अपघात झाला.या प्रकरणी एसटी चालकाविरोधात संगमेश्वर पोलसि ठाण्यात भादंवि कायदा कलम 279 आणि मोटार वाहन कायदा कलम 184 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.











